Ameesha Patel Imran Abbas Romantic Video: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. पण सध्या ती तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. 46 वयात अमिषा तिची सिंगल लाइफ एन्जॉय करत होती, पण आता तिला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाल्याची चर्चा होत आहे. त्याला कारण ठरलंय तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ. पण हा स्वप्नातील राजकुमार तिला भारतात नाही तर पाकिस्तानात सापडला आहे. आता ही चर्चा खरी असेल तर तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसणार आहे. अमिषाने पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बाससोबतचा एक रोमॅंटिक व्हिडीओ शेअर केलाय.
'गदर' सिनेमात हिंदुस्थानी तारा सिंहच्या प्रेमात पडणारी 'सकीना' रिअल लाइफमध्ये उलटं काही करत असल्याचं बोललं जात आहे. अमिषा पटेल आणि इमरान अब्बास डेटिंग करत असल्याची चर्चा आहे. पण यावर तिने अधिकृत असं काही सांगितलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच बहरीनमध्ये आयोजित एका अवॉर्ड शोमध्ये दोघांची भेट झाली होती. दोघांना सोबत चांगला वेळ घालवला आणि बॉलिवूड गाण्यांवर त्यांनी व्हिडीओही तयार केले. जे लोकांना खूप आवडत आहे.
अमिषाने इमरानसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. ज्यात दोघेही ‘दिल में दर्द सा जगा है..’ गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहेत. गाणंही फार रोमॅंटिक आहे आणि अमीषा-इमरानही चांगलेच रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. सोशल मीडिया दोघांना एकत्र पाहून फॅन्स आनंदीही आहेत आणि प्रश्नातही पडले आहेत.
लेटेस्ट व्हिडीओ शेअर करताना अमिषाने लिहिलं की, 'गेल्या आठवड्यात बहरीनमध्ये आपल्या सुपरस्टार मित्रासोबत एन्जॉय करताना'. सोबतच तिने पोस्टमध्ये लिहिलं की, इमरानला सुद्धा तिच्यासोबत हा व्हिडीओ करताना मजा आली. हे गाणं त्याच्याही आवडीचं आहे. सोबतच तिने असंही लिहिलं की, ती त्याला पुन्हा भेटण्यासाठी उत्सुक आहे. इमरान अभिनेता असण्यासोबतच एक गायकही आहे आणि मॉडलही आहे.