फास्टर फेणे फेम अभिनेता अमेय वाघ कायमच काही तरी हटके करत रसिकांचं लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना सिनेमाचं प्रमोशन असो किंवा मग आणखी काही. हटके अंदाजात पोस्ट करुन त्याने सोशल मीडियावरील त्याच्या फॅन्सना नेहमीच सुखद धक्का दिला आहे. तुम्हाला वाटत असेल की अशा हटके पोस्ट अमेय फक्त त्याच्या सोशल मीडियावरील फॅन्ससाठीच करतो की काय? मात्र तसं नसून त्यांच्या या अनोख्या स्टाईलमधून त्याची जोडीदार म्हणजेच पत्नीही सुटलेली नाही. त्याचं झालं असं की अमेयची पत्नी साजिरी हिचा वाढदिवस. मग आपल्या लाडक्या बायकोला गोड शुभेच्छा देण्यासाठी अमेयने सोशल मीडियाचाच वापर केला. पत्नी साजिरीला त्याने एक हटके पोस्ट टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "तुला माणसांपेक्षा मांजरी जास्त प्रिय आहेत, म्हणूनच एक वाघ तुझ्यासाठी आयुष्यभर मांजर म्हणून राहायला तयार आहे! आपण एकत्र लई "cat" दिसतो हा भाग वेगळा! Happy birthday to my निरागस, निर्भीड, साजिरी-गोजिरी मालकीण!!! Extreme प्रेम" अशा शब्दांत अमेयने आपल्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या हटके आणि गोड शुभेच्छांसोबत अमेयने पत्नीसोबतचा एक रोमँटिक फोटोसुद्धा शेअर केला आहे. गेल्या वर्षी २ जुलै २०१७ रोजी अमेय आणि साजिरी रेशीमगाठीत अडकले. १३ वर्षांच्या मैत्रीच्या नात्याचं रुपांतर या दिवशी पती पत्नीच्या नात्यात झालं. साजिरी खूप चांगली मैत्रीण असून १३ वर्षे तिने हे नाते चांगल्या पद्धतीनं हाताळते आहे. म्हणूनच तिच्याशी लग्न करणार असल्याचं अमेयनं लग्नापूर्वी एक पोस्ट करुन फॅन्सना सांगितले होते. साजिरी ही मुंबईत एका बड्या कंपनीत नोकरी करते.
अमेय वाघ तिच्यासाठी आयुष्यभर 'मांजर" बनायलाही तयार, कोण आहे ‘ती’?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 11:08 AM
साजिरी खूप चांगली मैत्रीण असून १३ वर्षे तिने हे नाते चांगल्या पद्धतीनं हाताळते आहे.
ठळक मुद्देगेल्या वर्षी २ जुलै २०१७ रोजी अमेय आणि साजिरी रेशीमगाठीत अडकले.साजिरी ही मुंबईत एका बड्या कंपनीत नोकरी करते.