अफलातून अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. मराठीबरोबरच हिंदी सिनेमांमध्येही त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. काही दिवसांपूर्वीच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. नेहमी फिट असणाऱ्या श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. पण, यातून सुदैवाने श्रेयस पूर्णपणे बरा झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयसने हा त्याचा पूर्णजन्मच असल्याचं सांगितलं होतं. या संकटात श्रेयसची पत्नी त्याच्याबरोबर होती आणि तिने त्याला यातून बाहेर काढलं.
नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्तीने हजेरी लावली होती. या सोहळ्यात अमेय वाघने श्रेयससाठी भावुक कविता वाचून दाखवली. ते ऐकताच श्रेयस आणि त्याच्या पत्नीने डोळे पाणावले. तर इतर कलाकारही भावुक झाले. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
श्वास जरी थांबले असले तरी हात होते हातीकारण, देवासमोर भांडत तिथे त्याची बायको उभी होती...
देव म्हणाला, जा परत...त्याने विचारलं काय? देव म्हणाला जा परत...हिरो म्हणाला काय?
आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात उरीची, अन् बायकोच्या मनात साथीचीअजून धडधड चालू आहे...म्हणून श्रेयस अजून तुझ्याहृदयात धडधड चालू आहे...
श्रेयस तळपदेला डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्वास थांबल्याचं श्रेयसने सांगितलं होतं. त्यामुळे हा त्याचा पुर्नजन्म असल्याचंही अभिनेता म्हणाला होता.