Pushpa: The Rise Box Office Collection: साउथ स्टार अल्लू अर्जुनचा अॅक्शन एंटरटेनर पुष्पा - द राइज गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. एकीकडे 83 चित्रपटाला सिनेमागृहात प्रेक्षक मिळत नाहीयेत. त्याच वेळी, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिसऱ्या आठवड्यात, हिंदी व्हर्जनमध्ये पुष्पाच्या स्क्रीन काउंटमध्ये वाढ झाली आहे. पहिल्या आठवड्यात 1401 स्क्रीन्सवर आलेला पुष्पा तिसऱ्या आठवड्यात 1600 स्क्रीन्सवर आला आहे. हे पाहून तुम्ही स्वतः अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या यशाचा अंदाज लावू शकता.
हिंदी व्हर्जनला उत्स्फूर्त प्रतिसादअलीकडच्या काळात साऊथच्या अनेक चित्रपटांनी बॉलिवूडला अक्षरश: घाम फोडला आहे. एंटरटेनमेंट असो की टेक्नॉलॉजी किंवा मग बॉक्स ऑफिसवरची कमाई सगळ्यातच साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला मागे टाकलं आहे. हिंदी व्हर्जनला उत्स्फूर्त प्रतिसाद ‘पुष्पा’ हा अल्लू अर्जुनचा हिंदीत रिलीज झालेला पहिला सिनेमा आहे. पण याऊपरही या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनलाही मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. एकीकडे रणवीर सिंगच्या ‘83’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असताना दुसरीकडे ‘पुष्पा’ची क्रेझ कायम आहे. पुष्पा’ हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 47 कोटींचा बिझनेस केला आहे. लवकरच हा आकडा 50 कोटींवर पोहोचले, अशी अपेक्षा आहे. कमाईच्या बाबतीत पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनने इतर दक्षिण हिंदी डब चित्रपटांना मागे टाकले आहे. तर आतापर्यंत केजीएफ हिंदी या यादीत आघाडीवर होता.
पुष्पा चित्रपटाची कथा लाल चंदनाच्या तस्करीभोवती फिरते. अल्लू अर्जुन पुष्पाची भूमिका साकारत आहे. जो लॉरी चालक असून चंदनाची तस्करही आहे. हे अनेक छटा असलेले एक मजेदार पात्र आहे. पुष्पा मासेस चित्रपट. राजमुंद्रीजवळील मारेदुमिलीच्या जंगलात पुष्पाला चित्रित करण्यात आले आहे. शूटिंग लोकेशन खूप सुंदर आहे.
समंथाचा डान्स नंबर साऊथ अभिनेत्री समंथाच्या पुष्पा चित्रपटातील आयटम साँगने सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातला होता. Oo Antava… Oo Oo Antava या डान्स नंबरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर निर्मात्यांनी 5 कोटी रुपये खर्च केल्याचे वृत्त आहे. या गाण्यातील समांथाची सिझलिंग स्टाईल व्हायरल होत आहे.