नवी दिल्ली - महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर माफी मागितली आहे. महिला संघाला शुभेच्छा देताना त्यांच्याकडून मोठी चूक झाली होती. त्यांच्या ती चूक निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ट्विटरवरुन माफी मागितली आहे.
सोशल मीडियावर मेहमीच सक्रिय असणाऱ्या बच्चन यांनी आज रविवारी भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंचे विजयी कामगिरीबद्दल ट्वीट करत अभिनंदन केले होते. या ट्वीटसोबत बिग बी यांनी एक फोटो पोस्ट केला होता. मात्र या फोटोमुळे त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे.
भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दमदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयाचे कौतुक करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केले मात्र यात महिला खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे कौतुक असा उल्लेख केला. यानंतर नेटीझन्सनी या ट्वीटचे उत्तर देताना महिला खेळाडूंचे अभिनंदन केले. मात्र काही युजर्सच्या बिग बी यांनी केलेल्या चुकीकडे लक्ष गेले आणि त्यांनी याची त्यांना जाणीव करून दिली. काही युजर्सने बिग बी यांनी हायलाईट्स पाहताना हे ट्वीट केले असावे असे म्हटले, तर काहींनी बच्चन साहेबांनी भविष्य पाहिल्याचेही म्हटले आहे. आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत दिलगिरी व्यक्त केली आणि हा फोटो ऑस्ट्रेलिया नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयानंतरचा असल्याचे म्हटले.
भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 2-1 आणि पाच सामन्याच्या टी-20 मालिकेत 3-1 असा विजय मिळवाल आहे.