Join us

अमिताभ बच्चन यांनी बदला चित्रपटाबाबत व्यक्त केली ही खंत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 1:10 PM

बदला या चित्रपटाच्या यशाची निर्माते, डिस्ट्रीब्यूट तसेच बॉलिवूड मधील कोणत्याही व्यक्तीने दखल घेतली नाही असे अमिताभ यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देबदला या चित्रपटाच्या यशाबद्दल कोणीतरी बोलत आहे हे चांगलेच आहे. कारण या चित्रपटाचे निर्माते, डिस्ट्रीब्युटर तसेच इंडस्ट्रीतील मंडळी कोणीही या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलत नाहीये. 

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेला बदला हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. तसेच बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. हा चित्रपट सुपरहिट झाला असला तरी या चित्रपटाला मिळालेल्या यशाकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले असल्याची खंत अमिताभ बच्चन यांनी नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

बदला या चित्रपटाच्या यशाची निर्माते, डिस्ट्रीब्यूट तसेच बॉलिवूड मधील कोणत्याही व्यक्तीने दखल घेतली नाही असे अमिताभ यांचे म्हणणे आहे. अमिताभ यांनी काल ट्वीट करून याबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या ट्वीटवर या चित्रपटाचा निर्माता शाहरुख खानने लगेचच रिप्लाय दिला आहे. 

बदला या चित्रपटाने 85 करोड रुपये कमावले असे ट्वीट एका हँडलवरून करण्यात आले होते. यावर रिप्लाय देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, या चित्रपटाच्या यशाबद्दल कोणीतरी बोलत आहे हे चांगलेच आहे. कारण या चित्रपटाचे निर्माते, डिस्ट्रीब्युटर तसेच इंडस्ट्रीतील मंडळी कोणीही या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलत नाहीये. 

अमिताभ बच्चन यांनी बदला या चित्रपटाच्या बाबतीत केलेल्या या ट्वीटवर या चित्रपटाचा निर्माता शाहरुख खानने लगेचच रिप्लाय दिला आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सर, तुम्ही आम्हाला पार्टी कधी देत आहात याची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत. आम्ही रोज रात्री जलसाच्या बाहेर यासाठी उभे देखील असतो. 

 

बदला या चित्रपटाचे बजेट केवळ 10 करोड रुपये होते. पण या चित्रपटाने काहीच आठवड्यात 10 कोटीहून कित्येक अधिक रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले आहेत. सुजोय घोषने दिग्दर्शित केलेला बदला हा थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी बादल गुप्ता या वकिलाची भूमिका साकारली आहे तर तापसी पन्नू नैना या भूमिकेत दिसली आहे. त्यांच्या दोघांच्याही अभिनयाचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनबदलाशाहरुख खान