बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन लवकरच ‘बदला’ या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन हेही रणवीर सिंगसारखे रॅप करताना दिसतील.‘बदला’च्या मेकर्सनी स्वत: याचा खुलासा केला. ‘औकात’ असे या रॅप गाण्याचे बोल असतील. अमिताभ बच्चन स्वत: हे रॅप गातील. चित्रपटाच्या क्रेडिट लाईनसोबत त्यांचे हे रॅप दाखवले जाईल. या रॅपमध्ये कडक, बोच-या शब्दांसह अमिताभ चित्रपटाचा थ्रीलर पार्ट सांगताना दिसतील.
‘गली बॉय’ रणवीर सिंगनंतर आता अमिताभ बच्चनही गाणार रॅप सॉन्ग!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:54 IST
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन लवकरच ‘बदला’ या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे.
‘गली बॉय’ रणवीर सिंगनंतर आता अमिताभ बच्चनही गाणार रॅप सॉन्ग!!
ठळक मुद्दे‘बदला’ या चित्रपटात अमिताभ हे बादल गुप्ता नामक पात्र साकारताना दिसणार आहेत.