'द आर्चीज' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने (Agastya Nanda) इन्स्टाग्रामवरही डेब्यू केला आहे. अगस्त्यने हँडसम लूकमधील एक फोटो पोस्ट केला आहे. तो इन्स्टाग्रामवर येताच हजारो चाहत्यांनी त्याला फॉलो करायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर गौरी खानने पहिली कमेंट करत त्याचं इन्स्टाग्रामवर स्वागत केलं आहे. तसंच इतर बॉलिवूड कलाकारांनी कमेंट करत त्याला वेलकम म्हटलं आहे.
अगस्त्य नंदाने 'द आर्चीज' मधून सर्वांचंच मन जिंकलं. झोया अख्तरच्या या सिनेमातून अगस्त्य सोबतच सुहाना खान आणि खुशी कपूर या स्टारकीड्सनेही डेब्यू केले. सिनेमात अगस्त्यचा स्थिर अभिनय सर्वांनाच भावला. त्याच्यात 'बॉबी' सिनेमातील ऋषी कपूरची झलक दिसते असंही अनेकांनी प्रतिक्रिया दिली. अगस्त्यला आणखी बॉलिवूड सिनेमांची ऑफरही यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान त्याच्या इन्स्टाग्राम एन्ट्रीने चाहते जाम खूश झालेत.
अगस्त्यने इन्स्टाग्रामवर येताच शाहरुखची पती गौरी खानने पहिली कमेंट केली आहे. 'बिग हग' अशी कमेंट तिने केली आहे. तर अगस्त्यची आई श्वेता बच्चन, अर्जुन कपूर, अभिषेक बच्चन, झोया अख्तर यांनीही कमेंट करत त्याचं स्वागत केलं आहे. काही तासातच त्याचे १२ हजार फॉलोअर्सही झाले आहेत. 'दुसरी संधी पहिल्या संधीपेक्षाही जादुमय असते' असं त्याने त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिले आहे.
अगस्त्य नंदा सध्या सुहाना खानला डेट करत असल्याची चर्चा आहे. सुहाना अगस्त्यच्या फोटोवर काय कमेंट करते याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. सध्या सुहानानेही त्याला फॉलो केलं आहे.'द आर्चीज' नंतर अगस्त्यला श्रीराम राघलन यांच्या 'इक्कीस' सिनेमाची ऑफर मिळाली आहे. काहीच दिवसात तो सिनेमाचं शूटिंग सुरु करणार आहे.