बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या सूर्यवंशम चित्रपटाला 25 वर्षं पूर्ण झाली आहेत. अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' हा चित्रपट पाहिला नाही, असं क्वचितच कुणीतरी असेल. १९९८ मध्ये रिलीज झालेला 'सूर्यवंशम' हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. 'सूर्यवंशम' चित्रपटातील सगळीच पात्र, नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली.
या चित्रपटातील चिमुरडा अभिनेता तुमच्या लक्षात आहे का? तोच बाल अभिनेता ज्याने चित्रपटात अमिताभ बच्चन यांचं पात्र भानूप्रताप ठाकूरला विषारी खीर दिली होती. आनंद वर्धन याने सोनू हे पात्र साकारलं होतं. त्याने आपल्या क्यूटनेसने सर्वांची मने जिंकली होती. हिरा ठाकूरचा हा चिमुकला आता मोठा झाला आहे. लहानपणी क्युट दिसणारा हा अभिनेता आता मात्र हँडसम दिसत आहे. आनंद हा सोशल मीडिायवर सक्रीय असतो. तो आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
२५ वर्षानंतर आता आनंद वर्धनला ओळखणंही कठीण झालं आहे. आनंद वर्धन हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील मोठा स्टार आहे. आनंद वर्धनने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. १९९७मध्ये प्रदर्शित झालेला 'प्रियरागालू' हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी त्याला 'नदी' पुरस्कार देखील मिळाला होता. यानंतर त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'सूर्यवंशम' चित्रपटात काम केले. या सिनेमातून त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. आनंदने २०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.