Join us

अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन या क्षेत्रात आहे मोठे नाव,कधीच नसतात लाइमलाइटमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 2:53 PM

अमिताभ बच्चन यांच्यात यशाचे श्रेय भाऊ अजिताभलाही जाते. अजिताभ यांनी आर्थिक मदतही केली होती.

बच्चन कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर साऱ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. अमिताभ बच्चन यांचे कुटुंब सतत प्रसिद्धीच्या झोतात असते मात्र अमिताभ बच्चन यांचे लहान भाऊ अजिताभ बच्चनही लाइमलाइटपासून दूर राहणेच पसंत करतात.अमिताभ बच्चनप्रमाणे ते अभिनयक्षेत्रात नसले तरी ते बिझनेसमन आहेत. अजिताभ अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहेत. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या स्ट्रगलच्या काळात भाऊ अजिताभनेच मोठा आधार दिला.

आज अमिताभ बच्चन यांच्यात यशाचे श्रेय भाऊ अजिताभलाही जाते. अजिताभ यांनी आर्थिक मदतही केली. मुळात अमिताभ अजिताभप्रमाणे जास्त बोलके स्वभावाचे नव्हते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये जितक्या अजिताभ याच्या ओळखी होत्या. त्यांना भेटवण्यासाठी अजिताभ अमिताभ यांना बरोबर घेवून जात असे. अजिताभ आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये राहत होते तिथेच ते व्यवसाय करत होते. त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांची पत्नी रमोलानेही खूप मदत केली. लंडनमध्ये अजिताभ 15 वर्ष राहिले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबासह ते परत भारतात आले आणि आता इथेच स्थायिक झाले आहेत.

रमोल या बिझनेसमध्येच नाहीतर समाजसेवतेही त्यानी स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना रमोला, 2014 मध्ये एशियन ऑफ द ईयर या पुरस्कारानेही सम्मान करण्यात आले आहे.अजिताभ बच्चन एक मुलगा आणि तीन मुली आहेत. मुलगा भीम इन्वेस्टमेंट बैंकर आह. तो पूर्वी न्यूयॉर्कमध्ये राहत होता. नंतर तोही भारतात शिफ्ट झाला. मुलगी नैना, नीलिमा, नम्रता बच्चनही त्यांच्या क्षेत्रात खूप यशस्वी आहेत. नीलिमा एक एरोनॉटिकल इंजिनियर आहे. नम्रता बच्चनला पेटींग्सची आवड आहे. तिच्या पेंटीग्सची प्रदर्शनही ती भरवत असते. दिल्ली, मुंबईमध्ये पेटींग्सचे प्रदर्शनचे आयोजन करते. नैना बच्चनही इन्वेस्टमेंट बैंकर आहे तिने बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरसह लग्न केले आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन