Join us

अमिताभ बच्चन यांच्या नातीचं ब्रेकअप, 'या' बॉलिवूड अभिनेत्यावर जडला होता नव्याचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 9:34 AM

अमिताभ बच्चन यांच्या नातीचं ब्रेकअप झालं आहे.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा  (Navya Naveli Nanda) कायम चर्चेत असते. तिच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना कायम उत्सुकता असते. नव्या नवेली नंदाचं  अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत ब्रेकअप (Navya Naveli Nanda Siddhant Chaturvedi breakup) झाल्याचं समोर आलं आहे. हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेंकाना डेट करत होते.  मात्र, आता एका रिपोर्टनुसार सिद्धांत आणि नव्या वेगळे झाले आहेत.

'बॉलीवूड हंगामा'च्या ताज्या रिपोर्टनुसार, सिद्धांत आणि नव्याने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतरही ते दोघे मित्र राहतील. नव्या ब्रेकअपमधून सावरण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.  सिद्धांत आणि नव्या अनेकवेळा एकत्र पापाराझींच्या कॅमेऱ्यात स्पॉट झाले होते. दोघे  ऋषिकेशला फिरायला गेले होते. तसेच सिद्धांत नव्याची आई म्हणजेच श्वेता बच्चनच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीलाही आला होता. यानंतरच दोघांच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला होता.  पण दोघांनी कधीच्या त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. आता दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे.

सिद्धांत चतुर्वेदीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा "खो गए हम कहाँ' या चित्रपटात झळकला होता. यामध्ये अनन्या पांडे व आदर्श गौरव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. तर नव्या नवेली नंदा सामाजिक सेवा, महिलांचे विषय यावर नव्या काम करते. तिने तिचं छोटं स्टार्टअपही सुरु केलं आहे, ज्यामाध्यमातून ती हे काम करते.  

टॅग्स :नव्या नवेलीअमिताभ बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूड