Join us

अमिताभ - रेखा एकत्र

By admin | Updated: January 2, 2015 23:39 IST

अमिताभ बच्चन आणि रेखा ‘सिलसिला’ चित्रपटानंतर कधी एकत्र काम करणार अशी चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून आहे

अमिताभ बच्चन आणि रेखा ‘सिलसिला’ चित्रपटानंतर कधी एकत्र काम करणार अशी चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. अनेक दिग्दर्शकांनी त्यासाठी प्रयत्न केले; पण त्याला यश आले नाही. रेखाही अजून अमिताभबरोबर घालवलेले क्षण विसरायला तयार नाही. मात्र आर. बाल्कींच्या ‘शमिताभ’ चित्रपटात अमिताभबरोबर रेखाही झळकणार आहे म्हणे. आता हे दोघे एकत्र दिसणार की वेगळे ते मात्र चित्रपट पाहताना कळेल.