‘शोले’तील गब्बरला कोण विसरू शकेल? ही भूमिका साकारली होती दिग्गज अभिनेते अमजद खान (Amjad Khan) यांनी. अमजद खान यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. पण आजही प्रेक्षकांना मनात घर करून आहे ती त्यांनी साकारलेली ‘गब्बर’ची भूमिका. ही भूमिका जणू त्यांच्यासाठीच बनली होती. पडद्यावर अमजद खान यांनी अनेक निगेटीव्ह भूमिका साकारल्या. मात्र ख-या आयुष्यात ते तितकेच चांगले पती व पिता होते. अमजद खान यांची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.
अमजद शेहलाच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की, यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी शेहलाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला. मात्र शेहला सध्या खूप लहान आहे, असे म्हणत तिच्या वडिलांनी हा प्रस्ताव नाकारला. यामुळे अमजद प्रचंड संतापले होते. यानंतर शेहलाच्या वडिलांनी तिला पुढच्या शिक्षणासाठी अलीगडला पाठवून दिले. आता शेहला व अमजद खान एकमेकांपासून दुरावले होते. आता केवळ पत्र हेच त्यांच्यातील संवादाचे माध्यम होते. दोघेही एकमेकांना पत्र लिहित. बराच काळ हा सिलसिला सुरू राहिला. अनेक वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये राहिले आणि योग्यवेळ येताच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अमजद खान यांचे आईवडिल पुन्हा एकदा मुलाचे स्थळ घेऊन शेहलाच्या घरी गेले. यावेळी शेहलाचे वडिल लग्नासाठी तयार झाले आणि 1972 साली हे कपल लग्नबंधनात अडकले.लग्नानंतर वर्षभरात या जोडप्याच्या घरी शादाब हा मुलगा जन्मला. एकीकडे मुलाचा जन्म आणि दुसरीकडे ‘शोले’ची भूमिका असा दुहेरी आनंद अमजद यांच्या वाट्याला आला. ‘शोले’ रिलीज झाल्यानंतर अमजद यांचे अख्खे आयुष्यच बदलले.
अमजद यांचे 27 जुलै 1992 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अमजद यांना तीन मुले आहेत. पत्नी शेहला मुलांसोबत राहते. शेहला कधीच पतीचे सिनेमे पाहत नाहीत. त्यांचे सिनेमे मला अमजदची आठवण देतात, म्हणून मी ते पाहणे टाळते, असे शेहला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.