Join us

अमृता खानलिलकर आणि पुष्कर जोग यांच्या ‘वेल डन बेबी’मधलं ‘हल्की हल्की’ गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 16:05 IST

‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे, जे घटस्फोट घेणार आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शनासाठी ‘वेल डन बेबी’ला केवळ काही दिवसांचा अवधी उरलेला असतानाच  चित्रपटातील आणखी एका नवीन गाणं रिलीज केलं आहे. ‘हल्की हल्की’ असे शीर्षक असलेले हे नवे गाणे आणि याचे सुखद संगीत कौटुंबिक-नाट्य असलेल्या या कथेत अगदी उत्तम प्रकारे बसते. याच्या लक्षवेधक व्हिडिओतील चमकदार सिनेमॅटोग्राफीसह या गाण्याचे बोल श्रोत्यांच्या हृदयाची अचूक तार छेडतात. ‘हल्की हल्की’ हा एक असा ट्रॅक आहे ज्याला प्रत्येक स्तरावरील श्रोते आपल्याशी जोडून घेऊ शकतील.

रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत रोहन प्रधान यांनी गायले असून वलय मुळगुंड यांनी लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या चित्रपटाच्या पहिले गाणे ‘आई-बाबा’ला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. कानसेनांचे पाय याच्या संगीतावर उत्साहाने थिरकायला लागले असून त्यांनी ते गाणे गुणगुणायला देखील सुरुवात केली आहे.   

‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे, जे घटस्फोट घेणार आहेत, परंतु नशिबाने त्यांना आश्चर्यकारकरीत्या एका वळणावर आणून उभे केले आहे. प्रियंका तन्वर दिग्दर्शित आणि मर्मबंधा गव्हाणे लिखित, या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग निर्मित आणि व्हिडीओ पॅलेसद्वारे सादर करण्यात येत असलेला हा चित्रपट भारतातील प्राईम सदस्य 9 एप्रिल 2021 पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील. 

टॅग्स :अमृता खानविलकरपुष्कर जोग