रणवीर सिंग व आलिया भट यांचा आगामी चित्रपट गली ब्वॉयचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात मराठी अभिनेत्री अमृता सुभाषरणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील अनुभवाबाबत सांगताना तिने रणवीरची खूप प्रशंसा केली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता म्हणाली की, माझे काम योग्य लोकांनी पाहिले आणि त्याचे फळ मला लगेच मिळाले. झोयाने माझे रमन राघव २.० मधील काम पाहिले होते. त्यावरच गली बॉय साठी तिने माझी निवड केली. मी स्वत:ला खूप नशीबवान समजते की, मला झोया आणि टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली. अमृताने या सिनेमात रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्या अनुभवाबद्द्ल अमृता म्हणते की, ‘रणवीर खरेच सगळ्यात मिसळून राहणारा कलाकार आहे. त्याला स्टारडमचा अजिबात गर्व नाही. त्याच्याशी व्यक्तिरेखेबाबत चर्चा करताना खूप काही नवे अनुभवण्यास मिळाले.’