Join us

अनंत – राधिकाच्या "शुभ आशीर्वाद' सोहळ्यात सुंदर पैठणी नेसून पोहोचल्या मिसेस उपमुख्यमंत्री, लेक दिविजानंही वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 09:50 IST

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा शुक्रवारी ...

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा शुक्रवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. यानंतर शनिवारी या नवदाम्पत्याचा 'शुभ आशीर्वाद' सोहळा पार पडला आहे. या कार्यक्रमाला  अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. यावेळी सर्वांच्या नजरा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा फडणवीस यांच्यावर येऊन थांबल्या. सोशल मीडियावर अमृता फडणवीस आणि दिविजा यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

अमृता फडणवीस आणि दिविजा यांनी आशीर्वाद समारंभात आपल्या मराठमोळ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पिवळ्या रंगाची पैठणी साडी, केसात गजरा, गळ्यात मोठा नेकलेस असा मराठमोळा लूक  मिसेस उपमुख्यमंत्री यांनी केला होता.  सुंदर पैठणीवर कपाळावर टिकली लावून त्यांनी आपला लूक पूर्ण केला. तर त्यांची लेक दिविजा फडणवीस हिनं अबोली रंगाचा लेहेंगा परिधान केला.  दोघीही पारंपरिक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसल्या. चाहत्यांना देखील दोघींचा लूक प्रचंड आवडला आहे.

अमृता फडणवीस आणि दिविजा यांनी अनंत- राधिकाच्या जामनगरमध्ये पार पडलेल्या प्री- वेडिंग सोहळ्यालाही हजेरी लावली होती. जामनगर येथील देखील दोघींचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात दोघींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमील त्यांचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या पोस्ट वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा आहेत. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचे 'मंगल उत्सव' किंवा लग्नाचे रिसेप्शन हे १४ जुलै रोजी आयोजित केले आहे. तर, १५ जुलै रोजी मुंबईत दुसरी रिसेप्शन पार्टी आयोजित केली जाणार आहे.

टॅग्स :अमृता फडणवीससेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरलदेवेंद्र फडणवीसमुकेश अंबानीअनंत अंबानी