राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि पार्श्वगायिका अमृता फडणवीस यांनी अल्पावधीतच गायन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या गाण्याचा छंद जोपासत अनेक गाणी प्रेक्षकांसाठी आणली. काही दिवसांपूर्वीच 'मूड बना लेया वे' हे त्यांचं नवं पंजाबी गाणं घेऊन त्यांनी एंट्री केली होती. आता, प्रजासत्ताक दिनीअमृता फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. अमृता यांना चित्रपटासाठी गाणं गाण्याची ऑफर मिळाली असून या गाण्याचा ट्रेलरही त्यांनी चाहत्यांसाठी प्रसिद्ध केला आहे.
अमृता फडणवीस यांच्या पंजाबी गाण्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर, आता थेट चित्रपटात त्यांनी, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा... हे गाणं गायलं आहे. भारतीयन्स असं या चित्रपटाचं नाव असून तो बहुभाषिक चित्रपट असणार आहे. याच, चित्रपटात अमृता फडणवीसांनी हे गाणं गायलं आहे. याबाबतचा व्हिडिओही ट्विटरवरुन शेअर केला असून सर्वांनीच हे संगीत ऐकावं, असं आवाहनही त्यांनी केलंय.
'तुम्हाला #republicday2023 च्या खूप खूप शुभेच्छा!आगामी बहुभाषिक चित्रपट 'भारतीयन्स' साठी 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा' हे देशभक्तीपर गाणे गाणं हा मोठा सन्मान होता. श्री सत्य कश्यप यांचं अंगावर शहारा आणणारं हे संगीत सर्वांनी ऐकायलाच हवं' असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर त्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छाही देण्यात येत आहेत.
दरम्यान, गाण, डान्स यानंतर सिनेमात येण्याचं काही प्लनिंग आहे का असा प्रश्न विचारताच अमृता यांनी म्हटलं होतं की, सिनेमात येण्याच माझं काहीच प्लनिंग नाही. मी जे गातं त्यात माझे इमोशन असतात त्या हिशोबाने मी अॅक्ट करते आणि त्यातच मला समाधान आहे, असे अमृता यांनी सिनेमात अभिनय करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले होते.