Join us

गाण्याचा सराव अन् बरंच काही! अमृता फडणवीसांनी आशा भोसलेंकडून घेतलं गायनाबद्दल मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:36 IST

अमृता फडणवीस यांनी आशा भोसलेंच्या भेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Ash Bhosle) यांना नुकताच 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आशा भोसलेंची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. तसंच यावेळी आशा ताईंनी मिसेस फडणवीसांना गाण्याबाबतीत मोलाचा सल्लाही दिला. 

अमृता फडणवीस यांनी आशा भोसलेंच्या भेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले,' आज आशा भोसले यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. गाण्याबाबतीत त्यांच्याशी संवाद साधता आला. प्रॅक्टिस टेक्निक आणि व्हॉइस मॉड्युलेशन बाबतीत त्यांनी मला मार्गदर्शन केले. पुढच्या संगीतविषयक मार्गदर्शनाची मी आतुरतेने वाट पाहीन.'

अमृता फडणवीस यांना गायनाची आवड आहे. त्यांचे आतापर्यंत काही म्युझिक अल्बमही रिलीज झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही भेट नक्कीच खास होती. दरम्यान आशा भोसले यांना २४ मार्च रोजी राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडिया येथे हा सोहळा पार पडला.

टॅग्स :अमृता फडणवीसआशा भोसलेबॉलिवूडसंगीत