Join us

Chandramukhi!! जिकडे तिकडे ‘चंद्रमुखी’चीच चर्चा, ट्रेलरमधील डायलॉगवर तर फिदा झालेत फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 15:41 IST

Chandramukhi Trailer : आपल्या मोहमयी रूपांने व अदांनी घायाळ करणारी चंद्रा आणि ध्येयधुरंदर राजकारणी दौलतराव देशमाने यांच्या निर्मळ प्रेमकहाणीने सर्वांनाच वेड लावलं आहे. ही प्रेमकहाणी किती दमदार आहे, याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. ट्रेलरचा एक एक डायलॉग प्रेमात पाडतो.

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित असलेला सिनेमा ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi)लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा दमदार ट्रेलर (Chandramukhi Trailer) काल रिलीज झाला. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), आदिनाथ कोठारे (Addinath Kothare), मोहन आगाशे, मृण्मयी देशपांडे अशी तगडी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा येत्या २९ एप्रिलला रिलीज होतो आहे. या सिनेमाचा ट्रेलर काल  प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि सोशल मीडियावर याच ट्रेलरची चर्चा रंगली. सोशल मीडियावर तर या ट्रेलरनं नुसता धुमाकूळ घातला. सर्वाधिक चर्चा झाली तर ट्रेलरमधील संवादांची.

होय,आपल्या मोहमयी रूपांने व अदांनी घायाळ करणारी चंद्रा आणि ध्येयधुरंदर राजकारणी दौलतराव देशमाने यांच्या निर्मळ प्रेमकहाणीने सर्वांनाच वेड लावलं आहे. ही प्रेमकहाणी किती दमदार आहे, याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. ट्रेलरचा एक एक डायलॉग प्रेमात पाडतो. विश्वास बसत नसेल तर, ‘चंद्रमुखी’च्या ट्रेलरवरच्या कमेंट्स तुम्ही वाचायलाच हव्यात.

ट्रेलरमधील तुमचा आवडता डायलॉग कोणता? असा प्रश्न अमृताने विचारला आणि तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा नुसता पाऊस पडला. चाहत्यांनी ट्रेलरमधील प्रत्येक संवादाचं भरभरून कौतुक केलं आहे. ‘तुमच्या शब्द सूरांचे घोट मला जगवतील,’ हा संवाद सर्वाधिक भावल्याचं एका युजरने म्हटलंय. ‘आज संकष्टीचा चंद्र बी दिसल आणि तुमचा उपवास बी सुटल,’ हा डायलॉग आवडल्याचं एका युजरने सांगितलंय. ‘आभाळातला चंद्र बघायला दिवा कशाला लागतोय,’ हा संवाद आवडल्याचं अनेकांनी लिहिलं आहे.

‘तमाशाच्या तालमीत तयार झालेला आवाज हाय ह्यो... मंचावरून पहिला सा लागला की त्यो तंबूत बसलेल्या शेवटच्या बहिऱ्या म्हाताऱ्याच्या कानापर्यंत सुदिक पोहोचलाच पाहिजे,’ अशा अमृताच्या तोंडचा संवादही अनेकांना भावला आहे. ‘पूर्ण मुव्हीमध्ये चंद्राच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा प्रेक्षकांना आवडलेला डायलॉग असेल,’ अशी लक्षवेधी कमेंट एका युजरने केली आहे.

सध्या ‘चंद्रमुखी’च्या ट्रेलरवर चाहत्यांच्या उड्या पडत आहेत. युट्यूबवर आत्तापर्यंत 3 लाखांवर लोकांनी तो पाहिला आहे. चाहते ट्रेलरचं कौतुक करताना थकत नाहीयेत. एकंदर काय तर या ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :चंद्रमुखीअमृता खानविलकरआदिनाथ कोठारे