'द केरळ स्टोरी' सिनेमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. चारच दिवसात सिनेमात ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. लव्ह जिहादवर भाष्य करणारी सत्यघटनेवर आधारित ही कथा आहे. सिनेमाला प्रचंड विरोध होतोय तर काही ठिकाणी समर्थनही मिळताना दिसतंय. पण यामध्ये मराठी कलाकारांनी काहीच भाष्य केलेलं नाही. यावर जेव्हा एका चाहत्याने अमृता खानविलकरला (Amruta Khanvilkar) प्रश्न विचारला तेव्हा तिने काय उत्तर दिलं बघुया.
अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या लंडनमध्ये सिनेमाचं शूट करत आहे. दरम्यान ती अनेक फोटोही सोशल मीडियावर अपलोड करत आहे. अशाच एका फोटोवर कमेंट करत चाहत्याने विचारलं, "मॅडम, द केरळ स्टोरीला मराठी इंडस्ट्री प्रमोट का करत नाही? बहुतांश सगळे तरुण पाठिंबा देत आहेत. यामुळे लोकांना अपेक्षा आहे की leading fan base असणाऱ्या सेलिब्रिटींनी पाठिंबा द्यायला पाहिजे. मला माहितीए हे तितकं सोपं नाही पण अवघडही नाही."
चाहत्याच्या या प्रश्नावर अमृता म्हणाली,"मी लंडनमध्ये आहे आणि अजून फिल्म बघितलेली नाही. महाराष्ट्र शाहीर बघितला आणि प्रमोट पण केला, तुम्ही पाहिला का?"
अमृताचं हे उत्तर नेटकऱ्याला काही पटलेलं नाही. त्याच्या मुख्य प्रश्नाचं पटेल असं उत्तर अमृताने दिलेलं नाही. एकंदर काय तर 'द केरळ स्टोरी' चा मुद्दा प्रचंड गाजतोय आणि याचा सिनेमालाच जबरदस्त फायदा होताना दिसतोय.