Brahmastra Trailer : आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) बहुप्रतिक्षीत, बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra ) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. अगदी काही तासांत हा ट्रेलर 94 लाखांवर लोकांनी पाहिला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या ट्रेलरची प्रतीक्षा करत होते. तो रिलीज होताच चाहत्यांच्या ट्रेलरवर अक्षरश: उड्या पडल्या. खुद्द आलियाने हा ट्रेलर आवर्जुन पाहा, असं आवाहन केल्यावर तर चाहत्यांनी तो आवर्जुन पाहिला. यानंतर काय तर आलियानं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं. कौतुक करणाऱ्यांपैकीच एक होती आपली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar ).
होय, आलियाने ट्रेलरची पोस्ट शेअर करताच अमृताने त्यावर कमेंट करत, ‘ब्रह्मास्त्र’च्या ट्रेलरचं भरभरून कौतुक केलं. ‘Ooooooohhhhhhhhhhh goooddddddd spectacular mind blowing out of this world’ असं कमेंट करताना अमृताने लिहिलं. झालं...!! एका युजरने तिथेच अमृताला ट्रोल केलं.
अमृता खानविलकरची कमेंट पाहून या युजरने तिला ओव्हर रिअॅक्ट न करण्याचा सल्ला दिला. ‘इतकं पण ओव्हर रिअॅक्ट करू नकोस. इतका पण काही छान नाहीये, तुला सुद्धा हे माहित आहे,’असं या युजरने लिहिलं. अर्थात यावर अनेकांनी अमृताची बाजू घेत या ट्रोल करणाºया युजरला सुनावलं. ‘ट्रेलर खरंच खूप सुंदर आहे. आपण हॉलिवूडच्या सिनेमांना प्रोत्साहन देऊ शकतो मग आपल्या चित्रपटांना का नाही?’ अशा शब्दांत अनेकांनी अमृताची बाजू घेतली.
‘Raazi’ या चित्रपटात अमृता खानविलकरने आलिया भटसोबत काम केलंय. आलियाची ती फॅन आहे. आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचंही अमृताने असंच कौतुक केलं होतं. रणबीर व आलिया या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देताना अमृताने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती.