Join us

अमृता खानविलकरचे डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर, या लूकमध्ये तिच्या सौंदर्याला लागले चारचाँद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 11:32 IST

Amruta Khanvilkar Pushkar Jog First Song Released Aai Baba:‘आई बाबा’ हे गाणे अतिशय प्रतिभावंत अशा रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच त्याचे संगीत संयोजन देखील केले आहे. तर वलय मुळगुंद याच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे.

'कुणी तरी येणार येणार गं…. 'या गाण्याच्या ओळी सध्या सोशल मीडियावर ऐकायला मिळत आहेत. नुकतेच 'वेल डन बेबी' सिनेमातले गाणे प्रदर्शित झाले आहे. सिनेमात पुष्कर आणि अमृता खानविलकर दोघांच्याही मुख्य भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुष्कर आणि अमृताही जोडी या सिनेमाच्या निमित्ताने तुफान चर्चेत आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरलाही रसिकांची भरघोस पसंती मिळाली आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये अमृताने मात्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. 

अमृता गरोदर असल्याचे सिनेमात दाखवण्यात आले आहे. सिनेमात डोहाळे जेवणाचे गाणेही असून यात अमृताचा डोहाळे जेवणाचा लूक प्रचंड वाहवा मिळवत आहे. लाल रंगाच्या साडीत साजश्रुंगार केलेली अमृता अधिक सुंदर दिसत आहे. या लूकमध्ये तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत.

डोहाळे जेवणाचा लूक ख-या आयुष्यातला नसून रिल लाईफमधला असला तरी रसिकांना भावतो आहे. सध्या या गाण्यामुळे अमृताचे प्रचंड कौतुक होत आहे. सिनेमाच्या ट्रेलरप्रमाणे या सिनेमातील पहिलं गाणं  'आई- बाबा' रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. ट्रेलर आणि गाण्याची झलक पाहिल्यानंतर रसिकांमध्ये सिनेमा पाहण्याची उत्सुकता अधिक वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

‘आई बाबा’ हे गाणे अतिशय प्रतिभावंत अशा रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच त्याचे संगीत संयोजन देखील केले आहे. तर वलय मुळगुंद याच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे. संगीत संयोजनात रोहन गोखले याने देखील आपली भूमिका चोख निभावली असून उर्वरीत गाण्यांना अर्पिता चक्रवर्ती या गायिकेचा स्वरसाज लाभला आहे.

‘वेल डन बेबी’ हा सिनेमा प्रियांका तन्वर हिने दिग्दर्शित केला असून मर्मबंधा गव्हाणे याच्या लेखिका आहेत. या मध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद पंडित, मोहन नाडर आणि पुष्कर जोग हे सिनेमाचे निर्माते आहेत तर व्हिडीओ पॅलेस सादरकर्ते आहेत. ९ एप्रिलला हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. 

टॅग्स :अमृता खानविलकरपुष्कर जोग