Join us

मराठी चित्रपटसृष्टीवर आज ही चिमुकली करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 14:36 IST

सोशल मीडियावर अनेक कलाकार आपल्या चाहत्यांसाठी त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात.

सोशल मीडियावर अनेक कलाकार आपल्या चाहत्यांसाठी त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. आता एका चिमुकलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हा चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष आहे. अमृताने सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे.फोटोत तिच्यासोबत ज्योती सुभाष देखील दिसत आहेत. अमृताने या फोटोसोबत 'आई' असे कॅप्शन दिले आहे. अमृताच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अमृता सुभाष सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. 

 अमृताचे शिक्षण दिल्ली येथील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये झाले आहे. तिने हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांच्या नाटकात काम केले. तिचे ‘ती फुलराणी’ हे नाटक खूप गाजले. 2004 साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका सुद्धा आहे. 2012 साली तिने मराठी ‘सा रे ग म प’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेलिब्रिटी पर्वात भाग घेतला होता. अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचे 2014 साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

टॅग्स :अमृता सुभाष