Join us

गोल्डन साडी, कानात डुलणारे झुमक्यांनी लावले अमृता सुभाषच्या सौंदर्य चारचांद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 11:29 IST

गोल्डन रंगाच्या साडीत अमृता सुभाषचे सौंदर्य खुललं आहे.

अमृता सुभाष सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकताच अमृताने साडीतला तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. गोल्डन रंगाच्या साडीत अमृताचे सौंदर्य खुललं आहे. अमृताच्या या फोटोवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

नुकताच अमृताला गल्ली बॉय चित्रपटासाठी फिल्मफेअरमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अमृता सुभाषने ‘गली बॉय’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट सोबत स्क्रीन शेअर केली होती. दोन दिग्गज कलाकार असतानाही अमृतानेआपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.

नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये अमृताने आपली छाप उमटवली आहे.अमृता सैफ अली खान 'सेक्रेड गेम्स 2'मध्ये देखील झळकली होती.  

टॅग्स :अमृता सुभाषगली ब्वॉय