आजकालची नवी पिढी आणि काळानुरूप बदलत चाललेली कुटुंबपद्धती, यातूनच निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर भाष्य करणारा ‘मांजा’ हा चित्रपट वास्तवदर्शी आहे. स्वानुभव मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक जतीन वागळे यांनी या चित्रपटातून केला आहे. ड्रग्स, पॅरासाईट्स, एनर्जी सोर्स, पाल्याची मानसिकता असे विविध विषय मांजाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत असताना या सगळ्याशी निगडीत असणारं एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजेच प्रख्यात मनोवैज्ञानिक डॉ. आनंद नाडकर्णी यांना काही दिवसांपूर्वी मांजाच्या टीमने ‘मांजा’ हा सिनेमा दाखविला. त्यांनी चित्रपटाला घेऊन अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी मांडलेल्या मतांनुसार हा चित्रपट फक्त तरुण वर्गाला शिकवण किंवा त्यांनीच फक्त ह्यातून काही आत्मसात करावे असे नसून हा चित्रपट मुलं आणि त्यांचे पालक ह्या दोघांसाठी असून त्यातून त्यांनी अनेक गोष्टी आत्मसात कराव्या असा आहे. पालकांनी त्यांच्या मुलांना उद्भवणाऱ्या प्रश्नांवर दुर्लक्ष न करता, मुलांशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्या कलाने घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आणि मग त्यावर योग्य असा उपाय त्यांना सुचविला पाहिजे. यामुळे नात्यांमधील गोडवा नेहमीच टिकून राहतो. डॉक्टरांनी असेही व्यक्त केले की आजचा काळातील संपूर्ण परिस्थितीकडे पाहता अशा चित्रपटांची सध्या खूप गरज आहे आणि ह्याचा समाजावर योग्य असा परिणाम दिसून येईल.सायकॉलॉजिकल थ्रिलर असलेला ‘मांजा’ हा सध्याच्या परिस्थीचा आढावा घेणारा, मुलांना उद्भवणारे प्रश्न, त्यांच्यावर होणाऱ्या बाहेरच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा प्रभाव अशा अनेक समस्येवर भाष्य करणारा असा हा चित्रपट असेल.
आनंद नाडकर्णी यांनी केले ‘मांजा’चे कौतुक
By admin | Published: July 16, 2017 2:28 AM