'संगीत सम्राट पर्व दुसरे' मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ 'संगीत सम्राट पर्व २'ने उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षकआहेत.नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्स आणि त्यांचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे कार्यक्रमात रंगत आणत आहेत. या आठवड्यात 'संगीत सम्राट पर्व २'च्या मंचावर सज्ज होणारा पाहुणा कलाकार हा परीक्षक आदर्श शिंदे यांच्यासाठी खूप खास आहे.हा पाहुणाकलाकार दुसरा तिसरा कोणी नसून सुप्रसिद्ध लोकसंगीत गायक आनंद शिंदे म्हणजेच आदर्शचे वडील आहेत.
८ ऑगस्ट म्हणजेच लोकप्रिय विनोदी अभिनेता दादा कोंडके यांच्या जयंती निमित्त आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी आनंदशिंदे संगीत सम्राटाच्या मंचावर सज्ज झाले होते. ज्यांच्यामुळे आपल्याला उत्तम आवाजाचा वारसा मिळाला तेआपले वडील गायक आनंद शिंदे यांना संगीत सम्राटाच्या मंचावरपाहून परीक्षक आदर्श शिंदे भारावून गेले. तसेच त्यांनी आपल्या बालपणीच्या वडिलांशी निगडित काही आठवणी आणि किस्से सगळ्यांसोबत शेअर केले. दिवसेंदिवस संगीत सम्राट पर्व २ मधील स्पर्धा चुरशीची आणि कठीण होत चालली आहे.
तब्येत खराब असून देखील स्वरमय कोकण टीमची कॅप्टन जुईली जोगळेकर हिने अफलातून परफॉर्मन्स सादर केला आणि सगळ्यांची दादमिळवली. प्रत्येक आठवड्यात सगळयांची वाहवा मिळवणारी स्पर्धक हरगुन कौरने या आठवड्यात देखील तिच्या गाण्याने सगळयांची मनं जिंकली.एलिमिनेशन पुढील आठवड्यात असल्यामुळे या आठवड्यात सगळ्यांना गुणमिळवण्याची संधी मिळाली आणि सर्व टीम्सने एकमेकांना कमालीची टक्कर देत गुण कमावले.