Join us

अँटेलिया सजलं...घर आनंदानं भरलं! अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मोठ्या थाटात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 7:45 PM

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा आज अंबानी यांच्या 'अँटेलिया' निवासस्थानी कुटुंब, मित्र आणि आदरणीय परंपरांद्वारे औपचारिकपणे साखरपुडा संपन्न झाला.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा आज अंबानी यांच्या 'अँटेलिया' निवासस्थानी कुटुंब, मित्र आणि आदरणीय परंपरांद्वारे औपचारिकपणे साखरपुडा संपन्न झाला. गुजराथी हिंदू कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोल धना आणि चुनरी विधी यासारख्या जुन्या परंपरा कौटुंबिक मंदिरात आणि समारंभाच्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पाडल्या गेल्या. कुटुंबांनी भेटवस्तू आणि शुभेच्छा, सौहार्द आणि आनंदाची देवाणघेवाण केली आणि  विशेष म्हणजे अनंतची आई श्रीमती नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली अंबानी कुटुंबातील सदस्यांच्या सरप्राईज परफॉर्मन्स ने सर्वाना सुखद धक्का दिला. 

गोल धना - याचा शाब्दिक अर्थ गुळ आणि धणे - गुजराथी परंपरेतील लग्नाआधीचा समारंभ आहे, जो लग्नापूर्वीचा विधी आहे. या वस्तू वराच्या ठिकाणी वितरीत केल्या जातात जिथे कार्यक्रम होतो. वधूचे कुटुंब वराच्या निवासस्थानी भेटवस्तू आणि मिठाई घेऊन येतात आणि नंतर जोडपे अंगठ्याची देवाणघेवाण करतात. अंगठ्याची देवाणघेवाण केल्यानंतर जोडपे त्यांच्या वडिलांकडून आशीर्वाद घेतात.

संध्याकाळच्या उत्सवाची सुरुवात अंबानी कुटुंबातील सदस्यांनी अनंतची बहीण ईशा यांच्या नेतृत्वात श्री मर्चंट निवासस्थानी जाऊन त्यांना आणि राधिकाला संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देऊन केली. मर्चंट कुटुंबाचे अंबानी कुटुंबीयांनी त्यांच्या निवासस्थानी आरती आणि मंत्रोच्चाराच्या दरम्यान जोरदार स्वागत केले.

उभय कुटुंब अनंत आणि राधिका सोबत  संध्याकाळच्या समारंभासाठी भगवान कृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेले. तेथून समारंभाच्या ठिकाणी गणेश पूजनाने समारंभाची सुरुवात केली आणि त्यानंतर पारंपारिक लगन पत्रिकेचे  किंवा आगामी लग्नाचे आमंत्रणचे वाचन करण्यात आले. अनंत आणि राधिकाच्या कुटुंबियांमध्ये गोल धना आणि चुनरी विधी नंतर आशीर्वाद आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. श्रीमती नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली अंबानी कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या आश्चर्यकारक नृत्याने  जल्लोष केला आणि उपस्थित सर्वांमध्ये उत्साह आणि कौटुंबिक बंध जोडले.

त्यानंतर बहीण ईशाने रिंग सेरेमनी सुरू झाल्याची घोषणा केली आणि अनंत आणि राधिकाने कुटुंब आणि मित्रांसमोर अंगठ्याची देवाणघेवाण केली आणि त्यांच्या आगामी सहजीवनासाठी  त्यांचे आशीर्वाद मागितले. अनंत आणि राधिका काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि आजचा या समारंभाद्वारे उभयतांनी येत्या काही महिन्यात होणाऱ्या विवाह सोहळ्याच्या द्रुष्टीने एक पाऊल टाकले. दोन्ही कुटुंबांनी   राधिका आणि अनंतसाठी सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा इच्छिल्या.

नीता आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत, यूएसए मधील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि तेव्हापासून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये  जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डाचे सदस्य म्हणून विविध पदांवर काम केले आहे. सध्या ते आरआयएल च्या ऊर्जा व्यवसायाचे नेतृत्व करतात. शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका, न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवीधर आहे आणि एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.

टॅग्स :मुकेश अंबानी