Join us

मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस पोहोचल्या जामनगरला, खास लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 11:17 IST

अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस या जामनगरला पोहोचल्या.

रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे.अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रमांना शुक्रवारपासून जामनगरमध्ये सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता, त्यानंतर आता जामनगरमध्ये प्री-वेडिंग होईल आणि लग्न मुंबईत होणार आहे. अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसदेखील जामनगरला पोहोचल्या आहेत. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

सिनेसृष्टीसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला खास उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील जामनगरमध्ये पोहोचल्या आहेत. ‘वूम्पला’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.यावेळी त्यांच्या लूकने चाहत्यांच लक्ष वेधलं. अमृता या पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान करून वेस्टर्न लूक केला होता. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा आहेत.  गुजरातमधील जामनगरमध्ये १ ते ३ मार्च दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक या प्री वेडिंग फंक्शनसाठी दाखल होत आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शाहरुख खान, अमिताभ बच्चन, जान्हवी कपूर यांच्यासह  काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी गुरुवारी जामनगरला पोहोचले. विशेष म्हणजे  या प्री-वेडिंगमध्ये फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, वॉल्ट डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांसारखे उद्योगपतीही उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :अमृता फडणवीससेलिब्रिटीगुजरातमुंबईदेवेंद्र फडणवीस