बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या (Ananya Pandey) घरी लवकरच पाळणा हलणार आहे. अनन्या मावशी होणार आहे. तिची चुलत बहीण अलाना पांडेने (Alanna Pandey) नुकतंच प्रेग्नंसी जाहीर केली. पती आयव्होर आणि अलाना आईबाबा होण्यास सज्ज आहेत. बेबी बंपवर दाखवत अलानाने व्हिडिओ शूट केला आहे. अनन्या पांडे मावशी होणार म्हटल्यावर सर्वजण तिला शुभेच्छा देत आहेत.
चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे आणि पत्नी डेना पांडे यांची अलाना मुलगी आहे. गेल्या वर्षीच तिने बॉयफ्रेंड आयव्होर मॅकक्रेसोबत भारतात लग्नगाठ बांधली. मुंबईतच त्यांचे ग्रँड वेडिंग झाले. यावेळी संपूर्ण पांडे कुटुंबाची झलक दिसली होती. अलाना ही स्वत: सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहे. तसंच तिचा नवराही सेलिब्रिटी कंटेंट क्रिएटर आहे. दोघांच्या युट्यब पेजला लाखो सबस्क्रायबर्स आहेत. अलाना बऱ्याच काळापासून आयव्होरसोबत परदेशातच वास्तव्यास आहे. नुकतंच तिने बेबी बंप दाखवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. याशिवाय तिने व्हिडिओत सोनोग्राफीचीही झलक दाखवली. यामध्ये अलाना फ्लोरल स्ट्रिंग ड्रेसमध्ये खूपच क्युट दिसत आहे. तर आयव्होरने व्हाईट शर्ट आणि ट्राऊजर परिधान केली आहे. या व्हिडिओसोबत अलानाने कॅप्शनमध्ये लिहिले, "आतापासूनच आम्ही तुझ्या प्रेमात पडलो आहोत, तुला भेटण्यासाठी खूप आतुर आहोत."
अलानाच्या पोस्टवर अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. अलानाची आई, काकूने बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहोत अशी कमेंट केली आहे. तर तिच्या मित्रपरिवारानेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अलाना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तर आयव्होर फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आहे. दोघंही अमेरिकेत राहतताच. २०२१ साली आयव्होरने अलाना मालदीवमध्ये रोमँटिक अंदाजात प्रपोज केले होते. तर गेल्यावर्षी त्यांनी भारतात येत पारंपरिक पद्धतीने लग्न केले. आता ते आयुष्यातील पुढील टप्प्यावर आले असून लवकरच बाळाचं स्वागत करणार आहेत.