Join us

अनन्या पांडेची ही कामगिरी ऐकून तुम्हाला वाटेल तिचं कौतुक, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 17:43 IST

अनन्या पांडेची कामगिरी वाचून तुम्ही कराल तिचे कौतूक

अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर २'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'पती, पत्नी और वो'मध्येही तिने काम केले. ती सध्या आपला आगामी चित्रपट 'खाली पीली'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये आपल्या रोलमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी अनन्या काळजी घेत असते.

नुकतेच तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तब्बल २३ तास सलग काम केले. यातून अनन्याची कामाप्रती असलेली निष्ठा पहायला मिळाली.

'खाली पीली'च्या शुटिंगचे शेड्युल सकाळी ८ वाजता सुरू झाले होते. ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे शूटिंग सुरू होते. इतक्‍या व्यस्त शेड्युलनंतरही तिने त्याबाबत जराही त्रागा केला नाही किंवा तक्रारही केली नाही. अन्य वेळात ती आगामी चित्रपटांच्या स्क्रीप्ट वाचत बसलेली असते. त्यापैकी काही सिनेमांचे शुटिंग पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे.

'खाली पीली'मध्ये तिच्याबरोबर ईशान खट्टर असणार आहे. याव्यतिरिक्त अनन्या आणखीन एका चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :अनन्या पांडेपति पत्नी और वोदीपिका पादुकोण