Join us

सुंदर दिसत नाही म्हणून आजही काम मिळवण्यासाठी करावी लागते धडपड,या अभिनेत्रीने सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:31 PM

'स्टुंडट ऑफ द इअर 2' सिनेमासाठी माझे कास्टींग करण्यात आले होते. मात्र एका स्टारकिड्सला ती भूमिका करण्याची इच्छा होती. त्यामुळे ही भूमिका मला मिळालीच नाही.

चंदेरी दुनिया ही ग्लॅमरस आणि पैसा प्रसिद्धीचं आहे. त्यामुळे अभिनयापेक्षा आजही इथे सुंदर दिसण्याला महत्त्व दिले जाते. सुंदर दिसण्यासाठी अनेक खटाटोप अभिनेत्रींचा असतो. त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी त्यांची असते. मात्र अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांना त्या सुंदर दिसत नाही म्हणून कामच मिळत नाही. कामासाठी स्ट्रगल करावा लागणारे अनेक कलाकार पाहायला मिळतील. काम मिळवण्यासाठी खूप  स्ट्रगलही त्यांना करावे लागते. याच यादीत राधिका मदानचेही नाव गणले जाते.

 ''अंग्रेजी मीडियम'' सिनेमाची अभिनेत्री राधिका मदानने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने ही आपबीती सांगितली आहे. आजही सिनेसृष्टीत अभिनयापेक्षा दिसण्यालाच फार महत्त्व दिले जाते. अनेकदा मला ऑडिशनला बोलावले जायचे. माझा अभिनय दिग्दर्शकांच्या पसंतीसही पडायचा. मात्र ऐनवेळी सुंदर दिसत नाही असे सांगत अनेकदा रिजेक्टही केले जायचे. तुम्ही कितीही ऑडिशनसाठी ओपन असाल मात्र घराणेशाही आजही चित्रपटसृष्टीत सुरू आहे. 'स्टुंडट ऑफ द इअर 2' सिनेमासाठी माझे कास्टींग करण्यात आले होते. मात्र एका स्टारकिड्सला ती भूमिका करण्याची इच्छा होती. त्यामुळे ही भूमिका मला मिळालीच नाही.मी सुंदर दिसत नसल्याचे कारण त्यावेळी मला देण्यात आले होते. 

स्ट्रगलच्या कालावधीत प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिकत राहणे, स्वतःमध्ये काही ना काही बदल करत राहणे  सातत्याने प्रयत्न करत राहणे यावर माझे लक्ष केंद्रित करते. सध्या स्ट्रगलचा आनंद घेत इथवर मजल मारली आहे. पुढेही असेच काही तरी करण्याचा मानस असल्याचे राधिका सांगते.               

टॅग्स :राधिका मदनअंग्रेजी मीडियमइरफान खान