हिंदी चित्रपटसृष्टीचे झक्कास आणि सदाबहार अभिनेता म्हणजे अनिल कपूर. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य अभिनय क्षेत्राशी जोडला गेला आहे. लेक सोनम कपूर ही एक आघाडीची नायिका आहे. मुलगा हर्षवर्धन याने हिंदी चित्रपटसृष्टीत मिर्झिया चित्रपटातून पाऊल ठेवलं आहे. मात्र त्यांची लेक रिया कपूर मात्र अभिनय क्षेत्रात आलेली नाही. यामागचं कारण आहे ते तिचे वडील अभिनेता अनिल कपूर. त्यामुळे या चित्रपटसृष्टीचा भाग असूनही ती प्रसिद्धीपासून दूर असते. अभिनेत्री बनण्यापासून पापा अनिल कपूर यांनी रोखलं होतं असं रियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. केवळ अभिनेत्रीची बहिण किंवा तिच्यापुढे झाकोळली जाऊ नये अशी पापा अनिल कपूर यांना भीती होती. त्यामुळेच 'वेकअप सिद' चित्रपटाच्या सेटवरील पहिल्याच अनुभवात कल्पना आली होती की अभिनेत्री बनू शकणार नाही असं रियाने या मुलाखतीत सांगितले.
२०१० साली 'आयेशा' चित्रपटातून रियाने निर्माती म्हणून एंट्री मारली. त्यानंतर २०१४ साली तिने खुबसूरत चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात रियाची बहीण सोनमची भूमिका होती. २०१८साली रिया निर्मिती असलेल्या वीरे दी वेडिंग चित्रपटाला रसिकांची पसंती मिळाली. रिया एक डिझायनरसुद्धाही आहे. सोनमच्या प्रत्येक लूकवर अखेरची नजर ही रियाचची असते. रियाला खाण्या पिण्याचीही तितकीच आवड आहे. मांसाहारी खाणं तिच्यासाठी जणू जीव की प्राण. ती किती फूडी आहे याची कल्पना रियाचे इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यावर नक्कीच येईल.
रिया कपूर करण बूलानीसह रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. खुद्द सोनम कपूरने एका मुलाखतीत दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. १० वर्षापेक्षा अधिक काळापासून ते एकमेकांना डेट करत असल्याचंही तिने सांगितले होते. २०१८मध्ये करणने एक व्हिडिओ शेअर केला होता. यांत रिया एका गाण्यावर डान्स करत होती. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करणने माय गर्ल असं लिहिलं होतं. त्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चाही सुरू झालीय.