Join us  

Anil Kapoor Home VIDEO : अनिल कपूरचं घर आतून कसं दिसतं? पाहून तुम्हीही म्हणाल, बोले तो एकदम झक्कास...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 1:40 PM

Anil Kapoor house: ‘एव्हरग्रीन’ अभिनेता अनिल कपूरला पाहिलं की त्याचा एक गाजलेला डायलॉग ‘बोले तो एकदम झक्कास’ आठवल्याशिवाय राहत नाही. अनिल कपूरचं घर पाहिल्यानंतर तुम्हीही ‘बोले तो एकदम झक्कास’ असंच म्हणाल...

Anil Kapoor house: ‘एव्हरग्रीन’ अभिनेता अनिल कपूरला (Anil Kapoor) पाहिलं की त्याचा एक गाजलेला डायलॉग ‘बोले तो एकदम झक्कास’ आठवल्याशिवाय राहत नाही. आता अनिल कपूरचं घर पाहिल्यानंतर  तुम्हीही ‘बोले तो एकदम झक्कास’ असंच  म्हणाल. आत्तापर्यंत अनेकदा अनिल कपूर आपल्या घराबद्दल बोलला. पण आतून त्याचं हे घर कसं दिसतं, हे कधीच समोर आलं नव्हतं. पण आता अनिलचं घर आतून कसं दिसतं, हे पहिल्यांदा समोर आलं आहे. होय, एशियन पेंट्सने तयार केलेल्या व्हिडीओ अनिल कपूरचं घर तुम्ही बघू शकता.

या व्हिडीओत घर आणि या घराच्या आठवणींबद्दल अनिल कपूर भरभरून बोलता. त्याने सांगितलं, सोनम कपूरचा जन्म झाला, त्यावेळी आम्ही गृहप्रवेश केला होता. तिला आम्ही रूग्णालयातून थेट या नव्या घरी आणलं होतं. आधी मी येथे एक अपार्टमेंट खरेदी केलं होतं. ते फर्स्ट फ्लोरवर होतं. यानंतर मी दुसरा फ्लोर खरेदी केला, नंतर तिसरा आणि मग ग्राऊंडही खरेदी केला. मी एका बिल्डिंगला बंगल्यात बदललं. या घरात मला ऊब जाणवते. या घराची एक एक वीट, एक एक दगड, प्रत्येक गोष्टीत कष्ट आहे. कुठलाही स्कॅम नाही, कुठलंही नशीब नाही. ही माझ्या मेहनतीची कमाई आहे, असंही त्याने सांगितलं.

अनिल कपूरचं घरावर खास प्रेम आहे. या घराचे इंटेरियर त्याच्या पत्नीनं केलं आहे. घरातील बेडरूम, लिव्हिंग एरिया, सीटिंग एरिया शानदार आहे.  घरातील लॉबीमध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे. अशा अनेक कलात्मक वस्तूंनी घर सजवलेले आहे. घरांच्या भींतींवर वेगवेगळ्या, महागड्या पेन्टिंग्स आहेत. अनिल कपूर जिथे कुठे जातो तिथून घराच्या सुशोभिकरणासाठी लागणाऱ्या वस्तू आठवणीने घेऊन येतो.

 अनिलने त्याच्या करिअरची सुरूवात उमेश मेहरा यांचा १९७९ मध्ये आलेल्या ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटांमधून केली होती. या चित्रपटात तो  एका सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला होता. १९८३ साली आलेल्या ‘वो सात दिन’ या चित्रपटांत त्याने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती.त्यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितलंच नाही. स्लमडॉग मिलेनियर,सलाम -ए- इश्क ,बेवफा ,अरमान, नायक, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, दिल धडकने दो, वेलकम, तेजाब, घर हो तो ऐसा, मि. इंडिया अशा अनेक गाजलेल्या सिनेमात तो झळकला.

टॅग्स :अनिल कपूरबॉलिवूड