Join us  

झक्कास! वयाच्या ६६ वर्षीही अनिल कपूर आहे सुपरफीट, आगामी दोन सिनेमांसाठी अशी केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:42 AM

अनिल कपूरच्या या फोटोंवर वरुण धवनने मजेशीर कमेंट केली आहे.

झक्कास! असं म्हणलं की डोळ्यासमोर येतो अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor). ६६ वर्षीय या अभिनेत्याने आपल्या फिटनेसने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय. दिवसेंदिवस अनिल कपूर आणखी तरुण दिसत आहे.  नुकतंच त्याने शेअर केले फोटो पाहून कोणीही त्याच्या वयाचा अंदाज लावू शकणार नाही. अनिल कपूरने नुकतंच दोन सिनेमांचं शूट संपवलं आहे. या दोन्ही सिनेमांसाठी त्याला वेगवेगळ्या फिटनेसची गरज होती. हा फिटनेसचा प्रवास त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अनिल कपूर आगामी Animal आणि 'फायटर' या दोन सिनेमांचं शूट नुकतंच पूर्ण केलं आहे. या दोन्ही सिनेमांसाठी अनिल कपूरला दोन वेगळ्या फिटनेसची गरज होती. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतलेली दिसते. याची झलक त्याने फोटो शेअर करत दाखवली आहे. अनिल कपूरने लिहिले, 'गेलं वर्ष खूपच आव्हानात्मक होतं दोन पूर्णपणे वेगळ्या भूमिका साकारताना कसरत करावी लागली जे आव्हानात्मक आणि मजेदारही होतं. अॅनिमल सिनेमात ६५ वर्षीय बलबीर ही भूमिका ते फायटर सिनेमात ४५ वर्षीय एअर फोर्स ऑफिसरची भूमिका साकारली. या भूमिकांमध्ये खरेपणा यावा म्हणून मला गंभीर शारिरीक बदलांमधून जावं लागलं. तसंच मी जो युनिफॉर्म घातलाय त्याला मला न्याय द्यायचा होता. आता दोन्ही सिनेमांचं शूट पूर्ण झालंय. प्रेक्षकांनी दोन्ही चित्रपट बघावे यासाठी मी आणखी प्रतिक्षा करु शकत नाही.'

अनिल कपूरच्या या पोस्टवर इतर कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. वरुण धवनने कमेंट करत लिहिले, 'जेव्हा तुम्ही १८ वर्षांचे असता तेव्हा तुम्हाला हे करणं सोपं असतं. पण जेव्हा तुम्ही ३० चे होता तेव्हा थोडं कठीण जातं.' तर सोनल कपूरनेही वडिलांच्या या पोस्टवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. 

अनिल कपूर नुकताच 'नाईट मॅनेजर' सिरीजमध्येही दिसला होता.  यामध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या वयातही तो ज्या पद्धतीने सक्रिय आहे हे पाहून इतर कलाकारही चकित होत आहेत. 

टॅग्स :अनिल कपूरफिटनेस टिप्सवरूण धवनसिनेमा