Join us

Animal मध्ये तृप्ती डिमरीच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने दिली होती ऑडिशन, झाली रिजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 11:15 AM

सिनेमात रणबीर आणि तृप्ती डिमरीच्या इंटिमेट सीन्सची चर्चा आहे. या भूमिकेसाठी आधी एका आघाडीच्या अभिनेत्रीने ऑडिशन दिले होते.

रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) Animal सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रेक्षकांची गर्दी पाहता अगदी मध्यरात्रीचेही शो लावले जात आहेत. सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाची फ्रेश जोडी पाहायला मिळत आहे. पण आणखी एका अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतलंय. ती म्हणजे तृप्ती डिमरी (Tripti Dimri). 

अभिनेत्री तृप्ती डिमरीची Animal सिनेमात जोया ही भूमिका साकारली आहे. तिची भूमिका छोटी असली तरी महत्वाची आहे. यामध्ये तिने रणबीरसोबत अनेक इंटिमेट सीन्सही दिले आहेत. रश्मिकापेक्षा जास्त तृप्तीचीच चर्चा रंगली आहे. रणबीरसोबत तिची केमिस्ट्रीही खूप पसंत केली जात आहे. पण तुम्हाला माहितीये का तृप्तीच्या आधी ही भूमिका सारा अली खान (Sara Ali Khan) साकारणार होती. साराने तृप्तीच्या आधी ऑडिशनही दिले होते. मात्र मेकर्सला सारापेक्षा तृप्तीच जास्त योग्य वाटली आणि त्यांनी तिचे नाव फायनल केले. तसंच सारा इतका बोल्ड सीन देऊ शकणार नाही असंही मेकर्सना वाटल्याने त्यांनी साराला सिनेमात घेतले नाही.

सध्या Animal देश परदेशात तुफान कमाई करत आहे. पहिल्या तीनच दिवसात सिनेमाने भारतात २०० कोटींचा टप्पा पार केला  आहे. तर लवकरच सिनेमा ३०० कोटीही पार करेल असा अंदाज आहे. सिनेमात बापमुलाच्या नात्याची कथा दाखवण्यात आली आहे. हिंसा, रक्तपात असे एकंदर सीन्स यामध्ये आहेत. त्यामुळे सध्या सिनेमाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 'कबीर सिंह' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :सारा अली खानरणबीर कपूरबॉलिवूड