Join us

Animal: रश्मिका मंदानाचा 'अ‍ॅनिमल'मधला फर्स्ट लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 6:37 PM

Rashmika Mandanna : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरच्या आगामी 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. नुकतेच या चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनिल कपूरचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले आहेत. आता रश्मिकाचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टर समोर आले आहे.

काही काळापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये रश्मिका मंदाना हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रणबीर कपूरसोबत शूटिंग करताना दिसली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर खुलासा झाला होता की रणबीर आणि रश्मिका एका चित्रपटात दिसणार आहेत, ज्याचे नाव 'अॅनिमल' आहे. आता या सिनेमातील रश्मिका मंदानाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

रश्मिका मंदानाने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'अ‍ॅनिमल' मधून तिच्या लूकची झलक दाखवली. रश्मिकाने या ट्विटमध्ये लिहिले की, “गीतांजलीला भेटा”. अशाप्रकारे, दाक्षिणात्य अभिनेत्रीने अ‍ॅनिमलमधील तिच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव काय असणार आहे याचीही माहिती दिली आहे. या पोस्टरमध्ये, लाल आणि पांढर्‍या कॉम्बिनेशनच्या या साडीमध्ये रश्मिका मंदाना आपल्या साधेपणाने सर्वांची मने जिंकत असल्याचे दिसत आहे. रश्मिका मंदानाचा या चित्रपटातील लूकला सोशल मीडियावर पसंती मिळताना दिसत आहे.

'अ‍ॅनिमल'चा टीझर लवकरच होणार रिलीजरश्मिका मंदानाच्या आधी 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनिल कपूरचे लूक समोर आले आहेत. या चित्रपटाचा टीझरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा टीझर २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानारणबीर कपूर