Join us

गोव्यात नवऱ्यासोबत रोमँटिक मूडमध्ये दिसली अनीता हसनंदानी, यॉटवर दिसले किस करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 18:48 IST

अनीता हसनंदानी आणि तिचा नवरा रोहित रेड्डी सध्या गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनीता हसनंदानी आणि तिचा नवरा रोहित रेड्डी लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. हे दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि ते बऱ्याचदा त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. आता अनीता हसनंदानीने तिचा व रोहितचा खूप छान फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

अनीता हसनंदानी हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तेे दोघे यॉटवर बसलेले दिसत आहेत आणि एकमेकांना किस करताना दिसत आहेत. या फोटोच्या बॅकग्राऊंडला सुंदर सनसेट पहायला मिळतोय. हा फोटो शेअर करत अनीताने लिहिलं की, गोव्याची दुसरी बाजू.

हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप भावतो आहे आणि हा फोटो सोशल मी़डियावर खूप व्हायरल होताना दिसतो आहे. अनीता व रोहित यांनी डान्स रिएलिटी शो नच बलिएच्या ९व्या सीझनमध्ये सहभाग घेतला होते. ते दोघे या शोचे रनर अप आहेत. हा शो संपल्यानंतर ते दोघं व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गोव्यात आले आहेत.

अनीता हसनंदानी आणि रोहित रेड्डीने सोशल मीडियावर नच बलिए ९च्या प्रवासाबद्दल सांगताना निर्मात्यांचे आभार मानले आणि दोघांनी सांगितलं की, कसे त्या दोघांचे प्रेम आधीपेक्षा आणखीन जास्त वाढलं आणि त्यांचं नातं आणखीन घट्ट झालं.

अनीता हसनंदानी ये है मोहब्बतें मालिकेतील शगुनच्या आणि नागिन ३मधील विशाखाच्या भूमिकेसाठी प्रचलित आहे.

टॅग्स :अनिता हसनंदानीनच बलिये