Anjali Arora bold video goes viral: 'लॉक अप' या रियॅलिटी शो मध्ये सहभागी झालेली सेलिब्रिटी अंजली अरोरा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अंजली अरोराचा 'कच्छा बदाम' या गाण्यावरचा म्युझिक व्हिडिओमधील डान्स चांगलाच चर्चेत होता. या सगळ्या व्यतिरिक्त अंजली एका वाईट गोष्टीसाठीही चर्चेत आली होती. खरं तर, काही काळापूर्वी अंजली अरोराचे नाव एका MMS Leak शी जोडले गेले होते, ज्यामुळे तिची प्रतिमा मलिन झाली होती. असे असूनही, अंजली मात्र धाडसाने या साऱ्याला सामोरी गेली आणि इन्स्टाग्रामवर तिने आपल्या पोस्टची लोकप्रियता कमी होऊ दिली नाही. तिचे फोटो आणि व्हिडिओ कायमच व्हायरल होत असतात. अंजलीने नुकताच एक बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला आहे.
अंजली अरोराने नुसता ओव्हरकोट घालून शूट केला बोल्ड व्हिडिओ
अंजली अरोराने इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अंजलीने एक ओव्हरकोट घातला आहे. तिने केवळ एका ओव्हरकोटने आपले शरीर झाकण्याचा प्रयत्न केला आहे. या बोल्ड व्हिडिओतील अंजलीची स्टाइल आणि अदा थक्क करणारी आहेत. कॅमेऱ्यासमोरील तिच्या या बोल्ड लूकची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. तसेच चाहत्यांचाही हा व्हिडीओ खूप पसंतीस उतरतो आहे. पाहा तो बोल्ड व्हिडीओ-
MMS लीक होऊनही सौंदर्यवती डगमगली नाही!
या बोल्ड व्हिडिओमध्ये अंजलीने अतिशय मादक असे हावभाव केल्याचे दिसतात. तिने चाहत्यांच्या समोर कोण काय म्हणले याची तमा न बाळगता हा व्हिडीओ शूट केल्याचे दिसत आहे. हा बोल्ड व्हिडिओ पाहून अनेकांचे म्हणणे आहे की, अंजलीने MMS Leak च्या अनुभवातून काहीही शिकलेले नाही. तर काही म्हणत आहेत की इतकी वाईट पद्धतीने ट्रोल होऊनही अंजलीने स्वत:ची लोकप्रियता टिकवून ठेवली आहे आणि ती तिच्या हॉट स्टाईलने चाहत्यांना भुरळ घालताना दिसत आहे