सलमान खान (salman khan) याच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचं 17 वं (bigg boss 17) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या नव्या पर्वाची वाट पाहत आहेत. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी निगडीत अनेक अपडेट समोर येत आहेत. यामध्येच आता बिग बॉस १७ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर या बिग बॉसच्या घरात अंकिता चक्क २०० आऊटफिट्स घेऊन जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अंकिता आणि विकी बिग बॉस १७ मध्ये सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत. या शोमध्ये जाण्यासाठी त्यांनी सगळी प्लॅनिंग केली असून सध्या ते कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची तयारी करत आहेत. इतकंच नाही तर 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, विकी आणि अंकिता तब्बल २०० आऊटफिट आपल्या सोबत घेऊन जाणार आहेत.
दरम्यान, एकच ड्रेस पुन्हा रिपीट होऊ नये किंवा वापरला जाऊ नये यासाठी या जोडीने २०० आऊटफिट सोबत नेण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे हे सगळे कपडे नवीन असणार आहेत. इतकंच नाही तर अंकिता एका दिवसात तब्बल ३ वेळा तिचे आऊटफिट चेंज करणार आहे तर विकी २ वेळा. त्यामुळे ही जोडी त्यांच्या स्टाइलकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. त्यामुळे या जोडीची टास्क खेळण्याची पद्धत रंगते की फक्त स्टाइलच चर्चेत राहते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.