Join us

Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 9:51 AM

Ankita Prabhu Walawalkar : बिग बॉसच्या घरात सहभागी झालेली इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर नेहमीच चर्चेत राहिली. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या पर्वाचा ग्रॅण्ड फिनालेदेखील मोठ्या दिमाखात पार पडला. सूरज चव्हाण या सीझनचा विजेता ठरला आणि अभिजीत सावंत उपविजेता ठरला. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेली इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर नेहमीच चर्चेत राहिली. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी अंकिताने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या हाताचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर सर्वांना तिच्या प्रियकराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती. दरम्यान आता तिने एका मुलाखतीदरम्यान लग्नाबद्दल सांगितले आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने बॉयफ्रेंडबद्दल सांगितले. ती म्हणाली की, मी बिग बॉसमध्ये माझ्या लाइफ पार्टरनबद्दल सांगेन असे ठरवले होते. त्यालाही सांगितले होते की, त्या लेव्हलला जर मी पोहोचले तर मला तुझी गरज लागेल. मात्र आता लवकरच लग्न करून टाकते आणि तो इंडस्ट्रीमधलाच आहे. त्यामुळे लवकरच कळेल.

अंकिता लवकरच करणार लग्न

तर अंकिताने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, लवकरच ती लग्न करणार आहे आणि असे नाही आहे की मी हे लपवून ठेवते आहे. पण माझ्यामुळे काही गोष्टींवर परिणाम होऊ नये, कारण आम्ही एकाच इंडस्ट्रीतले आहोत. मात्र आमच्या दोघांचे काम वेगळे वेगळे आहे. आता मी शोमधून बाहेर आले आहे, ज्यामुळे मला स्थिर व्हायला थोडा वेळ लागले. मला कोणते नवीन काम मिळाले की मी लवकरच सांगेन.

टॅग्स :बिग बॉस मराठीअंकिता प्रभू वालावलकर