Join us  

आणखी एक फॅमिली ड्रामा

By admin | Published: March 20, 2016 2:13 AM

करण जोहरच्या बॅनरमध्ये बनलेला चित्रपट ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’मध्ये कौटुंबिक कलहापासून कथानक गुंफले आहे. करण जोहरच्याच ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात

कपूर अ‍ॅण्ड सन्स : हिंदी चित्रपट

- अनुज अलंकारकरण जोहरच्या बॅनरमध्ये बनलेला चित्रपट ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’मध्ये कौटुंबिक कलहापासून कथानक गुंफले आहे. करण जोहरच्याच ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात असे कथानक दाखविले आहे. शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात जे कथानक दाखविले आहे ते अनेकदा टीव्हीवर पाहायला मिळते. ही कथा आहे दादाजींच्या (ऋषी कपूर) कुटुंबाची. ते कपूर कुटुंबाचे प्रमुख आहेत. या कुटुंबात त्यांचा मुलगा हर्ष (रजत कपूर), हर्षची पत्नी सरिता (रत्ना पाठक शाह) आणि हर्षची दोन मुले राहुल (फवाहद खान) आणि अर्जुन (सिद्धार्थ मल्होत्रा) आहेत. हर्षच्या दोन मुलांचे आपसात पटत नाही. अर्जुनला असे वाटते की, त्याचे आई-वडील राहुलवर जास्त पे्रम करतात. यावरूनच दोन्ही भावांत नेहमी तक्रारी होत असतात. अर्थात हे कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी राहते. राहुल लंडनमध्ये राहतो तर अर्जुन अमेरिकेत राहतो. दादाजींचे एक स्वप्न आहे की, आपल्या हयातीत हे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येवो. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी अंतर्गत भांडणे हाच सर्वांत मोठा अडथळा आहे. अर्जुनच्या आयुष्यात टिया (आलिया भट्ट) येते. एखाद्या कौटुंबिक चित्रपटासारखाच या चित्रपटाचा सुखद शेवट होतो. दादाजींचे स्वप्न पूर्ण होते. वैशिष्ट्ये : या चित्रपटातील जमेची बाजू म्हणजे, कलाकारांचा अभिनय. ऋषी कपूर प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतात. रत्ना पाठक शाह आणि रजत कपूर यांनीही सहज अभिनय केला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा जेंव्हा शांत असतो तेंव्हाच तो अधिक चांगला अभिनय करतो. फवाद खानची संवादफेक चांगली आहे. पण, चेहऱ्यावरील हावभाव मात्र एकसारखेच आहेत. टियाच्या भूमिकेतील आलिया आपली छाप पाडून जाते. तरुणांना या तिघांची केमिस्ट्री आवडेल. इमोशनल सीनमध्ये डोस कधी कधी ओव्हर वाटतो. अर्थात काही सीन हृदयाला भिडणारे आहेत. छायाचित्रीकरण आणि लोकेशन चांगले आहे. एकूणच काय तर कपूर अ‍ॅण्ड सन्सचा हा ड्रामा तरुण पे्रक्षकांना थिएटरपर्यंत घेऊन येईल. पण, यश मर्यादित राहील. का पाहावा? रोमांस, इमोशन याबरोबरच ऋषी कपूरच्या अभिनयासाठी. का पाहू नये? कथानक दुबळे आहे आणि यात नवे असे काही नाही. दुसऱ्या भागात चित्रपट अधिक निराशा करतो.उणिवा : दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या कथानकात नवीन असे काही नाही. करण जोहर कंपनीच्या चित्रपटाच्या शैलीला कायम ठेवण्यासाठी कथानकाशी तडजोड केली आहे. पहिल्या भागात चित्रपट तरीही आकर्षक वाटतो. दुसऱ्या भागात चित्रपट थांबल्यासारखा वाटतो. कारण, मुख्य कथानकापासून चित्रपट रोमांसमध्ये अडकतो. क्लायमेक्सच्या बाबतीत तर खूप आधीच अंदाज येतो. त्यामुळे उत्कंठावर्धक असे काही राहत नाही. या कौटुंबिक चित्रपटात हॉट रोमांसचा तडका इतका आहे की, कुटुंबासोबत चित्रपट पाहणे कठीण आहे. दिग्दर्शक बत्रा हे चित्रपटात कुटुंब आणि रोमांस यांच्यात संतुलन ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. संगीत फारसे श्रवणीय नाही.