अभिनेता संजय दत्त सध्या कॅन्सरशी सामना करतो आहे. त्याच्या तब्येतीसाठी असंख्य चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरूवात केली आहे. दरम्याने त्याच्या पत्नीने त्याच्या चाहत्यांचे आभार मानत त्याच्या उपचाराबाबतची माहिती दिली आहे.
मान्यताना एक पत्रक प्रसिद्ध करून सांगितले की, संजय त्याच्या आजारासाठीचे सर्व प्राथमिक उपचार मुंबईतच करणार आहे. पुढील गोष्टी कोरोना व्हायरसची एकंदर परिस्थिती पाहून ठरवण्यात येतील. सध्या कोकिलाबेन रुग्णालयातील सर्वोत्तम डॉक्टर संजूची काळजी घेत आहेत, त्याच्यावर उपचार करत आहेत.
ती पुढे म्हणाली की, संजू फक्त माझ्या मुलांचा वडील आणि माझे पती नाहीत तर आई वडील वारल्यानंतर अंजू आणि प्रियासाठी देखील तो वडिलांचे छत्र बनला आहे. आमच्या कुटुंबासाठी तो सर्वकाही आहे. यावेळी आमच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात चाहत्यांच्या प्रार्थना, सदिच्छा आणि देवाचा आशीर्वाद यांच्या बळावर या संकटातून आपण विजेत्याप्रमाणे जिंकून बाहेर पडू असा मला विश्वास आहे.
काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला फुफ्फुसाच्या कॅन्सरची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यानेच सोशल मीडिया पोस्ट लिहित आपण येत्या काळाता कामापासून विश्रांती घेत असल्याचे सांगितले होते.