Join us

सेन्सॉर मूकपट 'माधबी कंकण' चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 2:53 PM

पॅरिस येथील एका चित्रपट संग्रहालयातून १९३० मध्ये तयार झालेल्या 'माधबी कंकण' या भारतीय मूकपटाचे रिळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाले आहे.  चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देसेन्सॉर मूकपट 'माधबी कंकण' चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यातपॅरिसमधून मिळाली माधबी कंकणची रिळं

संदीप आडनाईककोल्हापूर : पॅरिस येथील एका चित्रपट संग्रहालयातून १९३० मध्ये तयार झालेल्या 'माधबी कंकण' या भारतीय मूकपटाचे रिळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाले आहे.  चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली.

संग्रहालयाच्या खजिन्यात यामुळे एका अनमोल ठेव्याची भर पडली आहे. २०१७ मध्ये 'बिल्वमंगल' (१९१९) या भारतीय मूकपटाचे रिळ संग्रहालयाला मिळाले होते.  संग्रहालयाच्या खजिन्यात भर पडलेला आता हा दुसरा भारतीय मूकपट आहे. भारतीय चित्रपटाच्या इतिहासाच्या दृष्टीने चित्रपट अभ्यासक, संग्राहक व रसिकांसाठी हा चित्रपट महत्वाचा आहे पॅरिस येथील एका चित्रपट संग्रहालयातून 'माधबी कंकण' उर्फ स्लाव्ह गर्ल आॅफ आगरा या चित्रपटाचे १३ मिनिटांचे चित्रीकरण उपलब्ध झाले आहे. आता ते डिजिटाइज करण्यात आले आहे. बंगाली लेखक रमेशचंद्र दत्त यांनी १९२२ मध्ये लिहिलेल्या माधबी कंकण याच नावाच्या ऐतिहासिक कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.या ऐतिहासिक चित्रपटात १७ व्या शतकातील मुघल सम्राट शाहजहाँच्या मुलांमधील सत्तासंघर्षाची कहाणी आहे. १३ मिनिटांच्या मिळालेल्या चित्रीकरणात शाहजहाँ, शुजा आणि जहाँ आरा यांची काही दृश्ये आहेत. दिग्दर्शन ज्योतिष बॅनर्जी यांचे असून मुमताज बेगम यांनी जहाँआराची भूमिका केली आहे, तर मूकपटाच्या काळातील अभिनेता नवाब शहाजहाँच्या भूमिकेत आहे. ललितादेवी, भानू बॅनर्जी, लीलावती, जयनारायण मुखर्जी, फरीदा बेगम आदी कलाकारांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत, अशी माहिती चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.

'माधबी कंकण' आणि 'बिल्वमंगल' या दोन मूकपटाच्या शोधात सहभागी असल्याचा मला आनंद आहे. भारतीय चित्रपटाच्या इतिहासाच्या दृष्टीने आणि चित्रपट अभ्यासकांसाठी हे दोन मूक चित्रपट अनमोल ठेवा आहेत. अतिशय परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतर हा ठेवा प्राप्त झाला आहे.प्रकाश मगदूम,संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे

सेन्सॉर मंडळाने घातली होती बंदी'माधबी कंकण'मध्ये आग्रा येथील एका गुलाम महिलेची कहाणी आहे. या चित्रपटावर प्रारंभी बंदी घालण्यात आली होती. सेन्सॉर मंडळाने परवानगी दिल्यानंतर १९३२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.परदेशी तंत्रज्ञांचा सहभाग असलेला पहिला चित्रपट'चार्ल्स क्रीड' आणि 'माकोर्नी' या परदेशी तंत्रज्ञांच्या साह्याने चित्रपटाचे चित्रीकरण झाले. परदेशी तंत्रज्ञांचा सहभाग असलेला हा पहिलाच चित्रपट असावा.मादन थिएटर्सची निर्मितीमूकपटाच्या काळात भारतातील सर्वांत मोठी चित्रपट कंपनी असलेल्या कोलकाता येथील मादन थिएटर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

टॅग्स :सांस्कृतिकपुणेकोल्हापूर