Join us

अंशुमन विचारेच्या नव्या इनिंगबद्दल तुम्ही ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 5:48 PM

कलाक्षेत्रात अभिनेता, निवेदक, गायक, निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या अभिनेता अंशुमन विचारेने अभिनयक्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी योग्य मार्गदर्शन आणि तंत्रशुद्ध शिक्षण देण्याच्या दृष्टीने अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकेडमीची सुरुवात केली आहे.

आपण देखील चित्रपटसृष्टीचा भाग असावे, आपण अभिनय करावा, दिग्दर्शन करावे, कॅमेऱ्यासमोर अथवा कॅमेरामागे तरी आपल्याला काम करण्याची संधी मिळावी असे अनेकांना वाटत असते. पण या संबंधित शिक्षण कुठे मिळेल, चित्रीकरणाच्या तांत्रिक गोष्टी कुठे शिकायला मिळतील असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने त्याची अभिनयाची अॅकॅडमी सुरू केली असून तो त्याद्वारे अभिनयक्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणार आहे.

कलाक्षेत्रात अभिनेता, निवेदक, गायक, निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या अभिनेता अंशुमन विचारेने अभिनयक्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी योग्य मार्गदर्शन आणि तंत्रशुद्ध शिक्षण देण्याच्या दृष्टीने अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकेडमीची सुरुवात केली आहे. या क्षेत्रात पहिले पाऊल टाकत असताना योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन तुमचे करियर घडवते, हाच महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन या अॅकेडमीची रचना केली आहे. केवळ प्रशिक्षण देऊन ही संस्था थांबणार नाही तर प्रशिक्षणानंतर योग्यतेनुसार १०० टक्के संधीची हमी ही संस्था देणार आहे.

अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकेडमीत चित्रपट अभिनय, चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा आणि सेट डिझाईन यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तंत्रशुद्ध प्रशिक्षण, संवाद कौशल्य, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, प्रत्यक्ष अनुभव, ऑडिशनची तयारी या मुलभूत बाबींचे मान्यवरांकडून मार्गदर्शन हे अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकेडमी या अॅकेडमीचे वैशिष्ट्य असणार आहे.

एकांकिकांमधून घडलेला अंशुमन आज नाटक आणि सिनेमा क्षेत्रात उत्तम स्थिरावला आहे. 'श्वास', 'पोस्टर बॉईज', 'स्वराज्य', 'विठ्ठला शप्पथ' अशा अनेक मराठी सिनेमांंमध्ये अंशुमन विचारेने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोर्चा या सिनेमाद्वारे त्याने गायनाच्या क्षेत्रात देखील प्रवेश केलेला आहे. या गाण्याविषयी अंशुमनने सांगितले होते की, या गाण्याचे बोल आहेत, सत्य हरवले, सांगावयाचे कुणी? विचारांचे ठसे... गाण्याचा अनुभव तर मला आहेच, परंतु सिनेमासाठी पहिल्यांदाच गात असताना थोडे दडपण होते. पण नंतर आम्ही सर्वांनी ते गाणं खूप एन्जॉय केलं.

टॅग्स :अंशुमन विचारे