Join us

मराठी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक नवं नाटक; दमदार अभिनयाची मिळणार मेजवानी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 17:30 IST

मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस आले आहेत.

मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस आले आहेत. रंगभूमीवर मराठी नाटकं आता गाजायला लागली आहेत. प्रेक्षक नाटकांना हाऊस फुल्ल प्रतिसाद देत आहेत. जुने आणि नवीन कलाकार रंगभूमीवर वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातच आता नवीन नाटकाची भर पडणार आहे.  लवकरच सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत 'पाहिले न मी तुला' हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे.  लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा वेध यातून घेतला आहे. 

सध्या जमाना 'फिल्टर'चा आहे. एखादी गोष्ट अधिक छान असावी यासाठी 'फिल्टर’ चा वापर केला जातो. नवे नाते निर्माण करताना किंवा असलेले नाते जपताना महत्त्वाचा असेलला 'फिल्टर' अर्थात दृष्टिकोन व विश्वास आपण जाणीवपूर्वक निर्माण करतो का ? योग्यवेळी तो वापरतो का? हे बघणं ही तितकंच आवश्यक असतं, हे दाखवणाऱ्या 'पाहिले न मी तुला' या नाटकाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला.  या मुहूर्त प्रसंगी निर्माते प्रसाद कांबळी, अजय विचारे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेताअंशुमन विचारे, हेमंत पाटील , सुवेधा देसाई  या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून  संगीत निनाद म्हैसळकर यांचे आहे.  प्रकाशयोजननेची  जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे. 

टॅग्स :अंशुमन विचारेसेलिब्रिटीमराठी अभिनेतानाटक