परिणीती चोप्राला पाहाताच अनू मलिकने केली होती ही भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 05:36 PM2018-10-10T17:36:16+5:302018-10-11T08:30:00+5:30

इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या दरम्यान परिणीतीने तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट सगळ्यांना सांगितले. हे सिक्रेट अनू मलिकशी संबंधित होते. हे सिक्रेट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Anu Malik’s prediction for Parineeti Chopra which came true she revealed in Indian idol 10 at the promotion of Namaste England | परिणीती चोप्राला पाहाताच अनू मलिकने केली होती ही भविष्यवाणी

परिणीती चोप्राला पाहाताच अनू मलिकने केली होती ही भविष्यवाणी

googlenewsNext

इंडियन आयडलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक हिट गाणी सादर करत आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. या आठवड्याला नमस्ते इंग्लंड या चित्रपटातील परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर हजेरी लावणार आहेत. 

परिणीती आणि अर्जुनने या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान प्रचंड मजा-मस्ती केली. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहून ते दोघेही थक्क झाले होते. या सगळ्याच स्पर्धकांचा आवाज खूपच चांगला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाच्या दरम्यान परिणीतीने तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट सगळ्यांना सांगितले. हे सिक्रेट अनू मलिकशी संबंधित होते. हे सिक्रेट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
 
अर्जुन आणि परिणीतीने चित्रीकरणादरम्यान स्पर्धकांसोबत ताल धरला. तसेच खूप धमाल केली. याच दरम्यान परिणीतीने यश राज स्टुडिओमध्ये ती मदतनीस म्हणून काम करत असतानाचा एक किस्सा सांगितला. त्याकाळात ती अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग यांची मदतनीस म्हणून काम करत होती, तेव्हा ती योगायोगाने अनू मलिक यांना इंडियन आयडॉलचे जिथे चित्रीकरण होते त्याच स्टुडिओ मध्ये भेटली होती आणि अनू मलिकने तिला सांगितले होते, की लवकरच ती एक अभिनेत्री बनेल! परिणीतीसाठी तो एक दिवस खूपच खास होता. आज तिने बॉलिवूडमध्ये तिचे एक स्थान निर्माण केले आहे. याविषयी परिणीती चोप्रा सांगते, "बऱ्याच लोकांना हे माहीत नाही, पण माझे अनू मलिक यांच्यासोबत एक खास नाते आहे. जेव्हा आम्ही याच स्टुडिओत पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा त्यांनी मला विचारले की, मी एक अभिनेत्री आहे का, त्यावर मी 'नाही' असे उत्तर दिले होते. पण त्याच क्षणी, त्यांनी मला सांगितले होते की, लवकरच तू एक अभिनेत्री बनशील आणि जेव्हा मी पुन्हा भेटेन तेव्हा तू प्रसिद्ध अभिनेत्री झालेली असशील आणि आज मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इंडियन आयडलच्या सेटवर आली आहे.
 

Web Title: Anu Malik’s prediction for Parineeti Chopra which came true she revealed in Indian idol 10 at the promotion of Namaste England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.