गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) सोमवारी समारोप झाला. या मोहोत्सवाच्या क्लोजिंग सेरेमनीदरम्यान 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाला प्रोपगंडा आणि व्हल्गर म्हणून संबोधण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इस्रायली चित्रपट निर्माता नादव लॅपिडच्या (Nadav Lapid) प्रपोगंडा वक्तव्यानंतर, आता सेलिब्रिटीजच्या रिअॅक्शन्स यायलाही सुरुवात झाली. यातच अभिनेते अनुपम खेर यांचीही प्रतिक्रीया समोर आली आहे.
अनुपम खेर यांची प्रतिक्रीया - 'द कश्मीर फाइल्स'ला प्रोपगंडा म्हणून संबोधल्यानंतर, बॉलिवुड अॅक्टर अनुपम खेर यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, "असत्याची उंची कितीही अधिक असली तरी, ते सत्यासमोर नेहमीच ठेंगणेच असते," असे म्हणत फिल्म 'द कश्मीर फाइल्स'मधील आपले फोटोही शेअर केले आहेत.
इस्रायली चित्रपट निर्मात्याने 'द कश्मीर फाइल्स'ला प्रोपगंडा म्हटले आहे -चित्रपट महोत्सव कार्यक्रमादरम्यान, बोलतानवा इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड म्हणाले, मला आश्चर्य वाटले, की हा चित्रपट कार्यक्रमात दाखवण्यात आला. हे सर्व एका प्रपोगंडा प्रमाणे वाटत होते. यानंतर नादव लॅपिड यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले.
अॅक्टर दर्शन कुमारची प्रतिक्रिया -नादव यांच्या वक्त्यव्यानंतर, फिल्म 'द कश्मीर फाइल्स' ट्विटरवर ट्रेंड होत आहे. यानंतर फिल्म मेकर्स आणि कलाकारांच्या प्रतिक्रीया ही समोर येऊ लागल्या आहेत. अनुपम खेर यांच्या शिवाय, अॅक्टर दर्शन कुमारनेही नादव यांच्या वक्तव्यावरून टीका केली आहे. ''द काश्मीर फाइल्स' हा काश्मिरी पंडितांची झालेल्या दुर्दशा दाखविणारा चित्रपट आहे, हे सत्य नाकारता येणार नाही,' असे दर्शन कुमारने म्हटले आहे.