Join us

अनुपम खेर यांनी शेअर केला लग्नाचा फोटो , म्हणाले - जणू काही कालचीच गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 18:11 IST

अभिनेता अनुपम खेर व अभिनेत्री किरण खेर यांच्या लग्नाला ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

अभिनेता अनुपम खेर व अभिनेत्री किरण खेर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्या दोघांच्या लग्नाला ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. ते दोघेही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिलं की, प्रिय किरण. ३४व्या लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा! आपण बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी एकत्र रहायचं आपण ठरवलं आहे. ३४ वर्षे व्यतित केले पण असं वाटतं जणू काही कालचीच गोष्ट आहे. 

किरण खेर यांनी १९८५ साली अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांची पहिल्यांदा चंडीगढमध्ये भेट झाली होती. ते दोघे एकाच थिएटरमध्ये काम करत होते. कामादरम्यान ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

किरण खेर यांनी १९८० साली चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी मुंबई गाठली. याच दरम्यान किरण खेर यांना एका मोठ्या बिझनेसमॅन गौतम बेरी यांच्यावर प्रेम झालं आणि त्या दोघांनी लग्नदेखील केलं. 

काही वर्षांनंतर किरण यांनी मुलगा सिकंदरला जन्म दिला. त्यानंतर किरण खेर व त्यांच्या नवऱ्याला त्यांच्या नात्यात काही ठीक नसल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर अनुपम खेर यांनी त्यांच्या घरातल्यांच्या सांगण्यावरून १९७९मध्ये मधुमालती नामक एका तरूणीशी विवाह केला. पण ते दोघेही त्यांच्या विवाहित जीवनापासून खूश नव्हते. 

किरण खेर व अनुपम खेर यांनी थिएटरमध्ये काम करणं सोडलं नव्हते. एकेदिवशी नादिरा बब्बर यांच्या नाटकासाठी दोघे कोलकाताला गेले होते. त्यावेळी त्या दोघांची पुन्हा भेट झाली.नाटक संपल्यानंतर त्या दोघांना जाणवलं की त्यांच्यात काहीतरी आहे. त्यानंतरच्या भेटीत अनुपम खेर यांनी किरण यांना प्रपोझ केला. त्यानंतर ते दोघं वारंवार भेटले आणि त्यांच्यातील नातं आणखीन बहरत गेलं.

त्यानंतर त्या दोघांनी आपल्या पार्टनरना घटस्फोट दिला आणि १९८५ मध्ये ते विवाहबद्ध झाले. लग्नानंतर अनुपम यांनी सिकंदरला आपले आडनाव लावले. किरण खेर व अनुपम खेर यांना एकही मुल नाही. 

टॅग्स :अनुपम खेरकिरण खेर