Join us

Mahima Chaudhry Breast Cancer: महिमा चौधरीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, आता अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:52 IST

Mahima Chaudhry Breast Cancer: अभिनेते अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत ती हीरो असल्याचं म्हटलंय.

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सर्वात सुंदर आणि प्रतिभावान समजली जाणारी अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्याचा तिचा फोटो पाहून तिला ओळखणंही कठीण झालं आहे. 

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अनुपम खेर यांनी महिमा चौधरीसोबतचा स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. महिमा चौधरी ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहे, असं ते व्हिडीओमध्ये सांगताना दिसतायत. अनुपम खेर यांनी महिमा चौधरीचे हीरो असे वर्णन केले आहे.बदलला संपूर्ण लूकएकेकाळी आपल्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस स्टाईलने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महिमा चौधरीचा लूक ब्रेस्ट कॅन्सरनंतर पूर्णपणे बदलला आहे. अभिनेत्रीकडे पाहून तिला ओळखणेही अवघड आहे. महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याच्या बातमीने तिच्या चाहत्यांनाही दु:ख झालंय. तसंच ती लवकर बरी व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली आहे.

“मी महिन्याभरापूर्वी महिमा चौधरीला आपल्या ५२५ व्या चित्रपटात #TheSignature मध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी अमेरिकेहून कॉल केला होता. तेव्हा तिला ब्रेस्ट कॅन्सरसारखा आजार झाल्याचं समजलं. ही गोष्ट मी तिच्या फॅन्ससोबत शेअर करावी असं तिला वाटत होतं,” असं अनुपम खेर व्हिडीओ शेअर करत म्हणाले.

टॅग्स :महिमा चौधरीकर्करोगबॉलिवूडअनुपम खेर