प्रसिद्ध बॉलिवूड आणि भजन गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचं वयाच्या केवळ ३५ व्या निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. आदित्यच्या किडनी फेल झाल्याने त्याचं निधन झाल्याचं समजतं. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.
२०२० या वर्षात बॉलिवूडमधून अनेक वाईट बातम्या समोर आल्या. इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान आणि सुशांत सिंह राजपूतसहीत अनेक कलाकारांचं निधन झालं. अशात आदित्य पौडवालच्या निधनाची बातमी आली. शनिवारी सकाळी आदित्यचं निधन झालं. त्याच्या किडनी फेल झाल्याने इतक्या कमी वयात त्याचं निधन झाल्याची माहिती आहे.
आदित्य हा म्युझिशिअन होता. त्याचं नाव भारतातील सर्वात कमी वयाचा म्युझिशिअन म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं होतं. आदित्यने आई अनुराधा पौडवालसोबत काही भजनेही गायली आहेत.
आईच्या पावलावर पाऊल
आदित्य पौडवालच्या इतक्या कमी वयात जाण्याने पौडवाल परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आदित्य पौडवाल आपल्या आईप्रमाणे भजन आणि भक्ती गीत गात होता. त्यासोबतच तो म्युझिक कंपोजही करत होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला भक्तीगीतांवरच त्याचं लक्ष केंद्रीत करायचं आहे. आदित्य एक चांगला म्युझिक डायरेक्टरही होता.
विश्वास बसत नाहीये - शंकर महादेवन
गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी पोस्टमधून दु:खं व्यक्त करत लिहिले की, 'ही बातमी समजल्यावर फार दु:खी झालो. आमचा प्रिय आदित्य पौडवाल आता राहिला नाही. पण माझा यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. तो एक कमालीचा संगीतकार होता आणि तेवढाच प्रेमळ व्यक्ती. मी नुकतंच एक गाणं गायलं होतं, जे त्याने खूप सुंदर प्रोग्राम केलं होतं. लव्ह यू भाई...तुझी आठवत येत आहे'.